Home /News /viral /

वाहतूक कोंडीत अडकलेल्या कार चालकाचं सार्वजनिक ठिकाणीच अजब कृत्य; पाहून शॉक झाले लोक

वाहतूक कोंडीत अडकलेल्या कार चालकाचं सार्वजनिक ठिकाणीच अजब कृत्य; पाहून शॉक झाले लोक

जेव्हा डॅनची नजर समोर असलेल्या कारवर गेली तेव्हा गाडीच्या मागील काचेतून दिसलं की चालक कारच्या डॅशबोर्डवर लावलेल्या स्क्रीनवर अनेक व्हिडिओचे कॅटलॉग पाहात होता

  नवी दिल्ली 24 जानेवारी : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की रस्त्यावर जेव्हा रेड सिग्नल असतो किंवा वाहतूक कोंडी होते, तेव्हा चालक आपला वेळ घालवण्यासाठी मोबाईलमध्ये काहीतरी करू लागतो किंवा स्क्रीनवर काहीतरी पाहू लागतो. ही खरंतर अगदी नॉर्मल गोष्ट आहे. मात्र, नुकतंच इंग्लंडच्या एका शहरात वाहतूक कोंडी झालेली असताना असं दृश्य पाहायला मिळालं, ज्याने सगळेच हैराण झाले. इथे वाहतूक कोंडीदरम्यान (Traffic Jam) एका कारचा चालक अॅडल्ट व्हिडिओ पाहताना दिसला (Tesla Driver Started Watching Adult Videos in Car). आंधळं प्रेम! बॉयफ्रेंडसाठी दान केली किडनी; 10 महिन्यातच तरुणीला मिळाला धोका मेट्रो वेबसाईटच्या वृत्तानुसार, 12 जानेवारीला डॅन किचनर नावाचा एक व्यक्ती साउथ लंडनच्या एडिंगटन येथे वाहतूक कोंडीमध्ये अडकला. डॅनने सांगितलं की ऑफिसमध्ये जाणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे रस्त्यावर अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यादिवशी इतकी गर्दी होती, की गाड्या वारंवार थांबत होत्या. इतक्यात डॅनची नजर त्याच्या समोर असलेल्या टेस्ला कंपनीच्या कारवर पडली. तुम्हा सर्वांना माहिती असेल की टेस्ला कंपनीच्या गाड्या अतिशय महाग असतात. त्यामुळे या गाड्या श्रीमंत लोकच खरेदी करतात. जेव्हा डॅनची नजर समोर असलेल्या कारवर गेली तेव्हा गाडीच्या मागील काचेतून दिसलं की चालक कारच्या डॅशबोर्डवर लावलेल्या स्क्रीनवर अनेक व्हिडिओचे कॅटलॉग पाहात होता. बराचवेळ लक्ष देऊन पाहिल्यानंतर डॅनला समजलं की हा व्यक्ती अॅडल्ट व्हिडिओज पाहात आहे. हे पाहून डॅनी हैराण झाला कारण सकाळचे साडेआठ वाजले होते आणि सार्वजनिक ठिकाणी हा व्यक्ती असं कृत्य करत होता.

  2 वर्षाच्या मुलाने ऑर्डर केल्या दीड लाखाच्या भलत्याच वस्तू;ऑर्डर पोहोचताच आई शॉक

  डॅनची गाडी आणखी थोडी जवळ गेली तेव्हा त्याने पाहिलं की व्यक्ती अॅडल्ट व्हिडिओ सर्च करण्यासोबतच महिलांचे न्यूड फोटोही बघत होता. डॅनीने मस्करी करत वेबसाईटसोबत बोलताना म्हटलं, की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आयुष्याक सगळं काही पाहिलं आहे, तेव्हा अशा गोष्टी दिसतात.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Car, Traffic

  पुढील बातम्या