Elec-widget

चिमुकलीने ख्रिसमसला मागितली 7 लाख 40 हजार रुपयांची गिफ्टस्, यादी सोशल मीडियावर व्हायरल

चिमुकलीने ख्रिसमसला मागितली 7 लाख 40 हजार रुपयांची गिफ्टस्, यादी सोशल मीडियावर व्हायरल

चिमुकलीची ख्रिसमस गिफ्टची यादी पाहून बापाला धक्काच बसला. चिमुकलीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर चक्क आयफोन 11 आहे.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : लहान मुलांना त्यांना काय पाहिजे असं विचारलं की, ते चॉकलेट किंवा एखादं खेळणं मागतली. त्यापेक्षाही जास्त म्हटलं तर एखादा मोबाईल गिफ्ट द्या म्हणतील. पण आता एका दहा वर्षांच्या चिमुकलीने ख्रिसमसला तिला हव्या असलेल्या गिफ्टची यादीच दिली आहे. या यादीतल वस्तूंची एकत्रित किंमत थोडी थोडकी नाही तर 7 लाख 40 हजार रुपयांपर्यंत आहे. सध्या सोशल मीडियावर ही यादी व्हायरल होत आहे. यामध्ये 26 गिफ्टचा समावेश आहे.

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर एका युजरने फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये लिहलं आहे की, माझ्या मुलीनं ख्रिसमसला हव्या असलेल्या गोष्टींची यादी तयार केली तेव्हा तिचं डोकं बिघडलं होतं.

मुलीने तयार केलेल्या यादीत आयफोन 11 पहिल्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय नवीन मॅकबुक एअर, अॅपल एअरपॉ़ड याशिवाय चॅनल पर्सही आहे. तसेच एक ससा, त्याचे कपडे आणि ते धुण्यासाठी पावडर यांचीही मागणी तिनं केली आहे.

Loading...

याहू न्यूजने दिलेल्या माहितीनुसार लिस्टमधील मागण्या पूर्ण करायच्या झाल्या तर त्याची किंमत 8 हजार पाउंड म्हणजेच जवळपास 7 लाख 40 हजार रुपये इतकी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: christmas
First Published: Nov 19, 2019 11:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...