मराठी बातम्या /बातम्या /Viral /

-45 डिग्री तापमानात अंडं आणि नूडल्सची झाली ही अवस्था, पाहा या शहरातील आश्चर्यकारक PHOTOS

-45 डिग्री तापमानात अंडं आणि नूडल्सची झाली ही अवस्था, पाहा या शहरातील आश्चर्यकारक PHOTOS

थंडीमुळे या शहरातील लोकांना घरातून बाहेर पडणं देखील मुश्कील झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरात वर्षभर थंडी असते.

  • Published by:  Kranti Kanetkar

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : महाराष्ट्रातच नाही तर उत्तर भारतात देखील तापमानाचा पारा खाली घसरत आहे. दिवसेंदिवस तापमानात घट होत असल्यानं आता कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत आहे. अंग गोठवणाऱ्या थंडीत जवान सीमेवर देशाची सुरक्षा करत आहेत. भारता बाहेर असं एक शहर आहे जिथे एखादी गोष्ट हवेतही गारठली जाऊ शकते हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्की बसेल पण याचं उत्तम उदाहरण देणारा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

देशातील बर्‍याच भागात थंड हवामान असे आहे की हात पाय गोठल्यासारखे वाटतात. पण जर आम्ही तुम्हाला अशाच एका जागेबद्दल सांगितले, जिथे थंडीमुळे गोष्टी हवेत गोठल्या आहेत, तर तुम्हाला धक्का बसेल असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचा-तक्रार की इन्स्पेक्शन? पोलीस ठाण्यात हजर झाले 3 अस्वल, पुढे काय घडलं पाहा VIDEO

सोशल मीडियावर सध्या एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. एका टेबलावर प्लेटमध्ये अंड आणि दुसरीकडे न्यूडल्स ठेवले आहेत. ह्या दोन्ही वस्तू हवेत गोठल्याचं दिसत आहे. अंडी मधूनच तुटत असताना हवेत मध्येच गोठले. त्याच वेळी, खाण्यासाठी नूडल्स वाढले जात असताना ते हवेतच गोठल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोला सोशल मीडियावर 19 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हा फोटो रशियाच्या सायबेरियातील नोव्होडीबिस्क परिसरातील आहे. या शहरात तापमान उणे 45 डिग्री सेल्सियसवर पोहोचलं आहे. अशा परिस्थित लोकांना घरातून बाहेर पडणं देखील मुश्कील झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरात वर्षभर थंडी असते.

First published:

Tags: Viral photos, Viral video.