मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'ATM मधून पैसे काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सूचना; या स्टेप्स केल्या तरचं पैसे मिळणार', पाहा भन्नाट VIDEO

'ATM मधून पैसे काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सूचना; या स्टेप्स केल्या तरचं पैसे मिळणार', पाहा भन्नाट VIDEO

दोन मैत्रिणींचा एटीएममधील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दोन मैत्रिणींचा एटीएममधील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दोन मैत्रिणींचा एटीएममधील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

  • Published by:  Prem Indorkar

मुंबई, 29 मे : कोरोना काळात अनेक मजेशीर व्हिडीओ समोर येत आहेत. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेल्या अनेक वर्षात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य केले आहेत. त्यामुळे गुन्हा करणाऱ्यांना पकडणं सोपं तर झालं आहेच, त्याबरोबरच अनेक मजेशीर किस्सेही समोर येत आहे. (ATM dance viral video)

एटीएममधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दोन तरुणी येथे पैसे काढण्यासाठी आल्या आहेत. मात्र पैसे काढण्याची त्यांची स्टाइल मात्र निराळीच आहे. ब्रेक डान्स करीत ही तरुणी एटीएममधून पैसे काढते. हा सर्व प्रकार एटीएममधील कॅमेरा टिपत आहे. एक मिनिट 10 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तरुणी विविध स्टेप्स करीत पैसे काढते. यावेळी तिच्यासोबत असलेली तरुणी हसत आहे. दोघींनीही मास्क घातला असल्याने त्यांची ओळख समोर आलेली नाही.

हे ही वाचा-Idea ची 12 वर्षे जुनी जाहिरात कोरोनाकाळात झाली खरी; VIDEO पाहून तुम्हालाही पटेल

पैसे काढल्यानंतर तरुणी आपल्या स्टाइलमध्ये एटीएमच्या मशिनला नमस्कारही करते. व्हायरल गप्पा या फेसबुक पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय त्यांनी मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, यापुढे एटीएम मधून पैसे काढतांना एवढ्या स्टेप्स कराव्या लागतील, तरच पैसे बाहेर येणार. रिझर्व्ह बँकेकडून सूचना...हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 28 हजार वेळा पाहिला गेला असून लोक मजेशीर कमेंट्सही करीत आहेत .विडिओ पाहण्या साठी ह्या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: ATM, Dance video