Home /News /viral /

भरवर्गात घोरत होते शिक्षक, विद्यार्थी मात्र प्रतीक्षेतच; सरकारी शाळांची भयावह स्थिती दाखवणारा VIDEO

भरवर्गात घोरत होते शिक्षक, विद्यार्थी मात्र प्रतीक्षेतच; सरकारी शाळांची भयावह स्थिती दाखवणारा VIDEO

देशभरातील ग्रामीण भागातील शाळांची कमी-जास्त प्रमाणात अशीच अवस्था आहे.

    आग्रा, 30 नोव्हेंबर : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा (School) बंद होत्या. सर्वत्र ऑनलाइन क्लास घेतले जात होते. काही दिवसांपूर्वी माध्यमिक तर आता लवकरच प्राथमिक विभागाच्या शाळाही सुरू होण्याची चिन्ह आहेत. याचा परिणाम शिक्षणपद्धतीवर होत असल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान आग्र्यातून (Agra) एक व्हिडीओ (Video Viral) समोर आला आहे. (teacher was snoring in the classroom students are just waiting VIDEO showing the dire condition of government schools) हा व्हिडीओ पाहून मुलांच्या शिक्षणाची चिंता व्यक्त केली जात आहे. हा व्हिडीओ आग्र्यातील बरारा ग्राम पंचायतस्थित बिचपुरी ब्लॉकयेथील नगला भूरिया प्राथमिक विद्यालयाचा असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर शिक्षण झोपले आहेत. विद्यार्थी शिक्षक जागे होण्याची प्रतीक्षा करीत आहे. यानंतर एका व्यक्तीने हा सर्व प्रकार शूट केला, तरी शिक्षकाला जाग आली नाही. हे ही वाचा-भर चौकात दोन रेडे आमनेसामने, तब्बल 1 तास धुडगूस, VIDEO व्हायरल दुसरीकडे यावेळी झोपलेल्या शिक्षकासह एक शिक्षिकादेखील उपस्थित आहे. मात्र त्यादेखील विद्यार्थ्यांना शिकवत नसल्याचं दिसत आहे. मुलं मात्र पाटी-पुस्तक काढून केवळ बसून आहेत आणि आपल्याला कधी शिकवणार या प्रतीक्षेत आहे. देशभरातील ग्रामीण भागातील शाळांची कमी-जास्त प्रमाणात अशीच अवस्था आहे. एकतर विद्यार्थी आहेत तर शिक्षक नाही आणि अनेकांना तर असे शिक्षक लाभल्यामुळे मुलांच्या भविष्याचा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Agra, School, Viral video.

    पुढील बातम्या