मराठी बातम्या /बातम्या /Viral /चहा, पकोडे विकून नाही तर कुत्र्यांना फिरवून शिक्षक बनला कोट्यधीश!

चहा, पकोडे विकून नाही तर कुत्र्यांना फिरवून शिक्षक बनला कोट्यधीश!

कुत्र्यांना फिरवून शिक्षक बनला कोट्यधीश

कुत्र्यांना फिरवून शिक्षक बनला कोट्यधीश

Most Unique Business: एकेकाळी शिक्षक म्हणून काम करणाऱ्या एका माणसाने अर्धवेळ डॉग वॉकर सुरू करुन कोट्यधीश झाला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    न्यूयॉर्क, 27 जानेवारी : नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला असा विचार अलीकडच्या काळात रुजताना दिसतो. काही जण दोन नोकऱ्या किंवा नोकरीसह पार्ट टाइम व्यवसायदेखील करतात. चांगलं उत्पन्न मिळावं हा यामागचा प्रमुख उद्देश असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीविषयी सांगणार आहोत. ही व्यक्ती अशाच वाटेवर चालत कोट्यधीश बनली आहे. शिक्षक म्हणून नोकरी करताना या व्यक्तीने कुत्र्यांना फिरवण्याचं अर्थात डॉग वॉकर म्हणून पार्ट टाइम काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने याला व्यवसायाचं स्वरूप दिलं आणि यासाठी काही कर्मचारी नियुक्त केले. आज त्याला या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांचा नफा मिळत आहे.

    कुत्र्यांना फिरवण्याच्या व्यवसायातून एक व्यक्ती एका वर्षात करोडपती बनली आहे. शिक्षकी पेशा सोडून एका वर्षाच्या आत या व्यक्तीने एक कोटी रुपये कमावले आहेत. ही व्यक्ती डॉग वॉकर म्हणून काम करते. या कामाला त्यानं व्यवसायाचं स्वरूप दिलं आहे. ही व्यक्ती या अनोख्या व्यवसायाचा अनेक शहरांमध्ये विस्तारदेखील करत आहे.

    `न्यूयॉर्क पोस्ट`च्या वृत्तानुसार, मायकेल जोसेफ हा अमेरिकेतल्या बुक्रलीन शहरात राहतो. तो शिक्षक होता. या पेशातून त्याला वर्षाला 30 लाख रुपये उत्पन्न मिळत होतं; पण हा पेशा सोडून दिल्यानंतर वर्षभरात त्याची कमाई एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. डॉग वॉकरच्या व्यवसायातून त्याने न्यू जर्सीत स्वतःचं घर खरेदी केलं आहे. याशिवाय त्याची स्वतःची एक कारदेखील आहे. नुकताच तो कुटुंबीयांसह डिस्ने वर्ल्डमध्ये फिरायला गेला होता. या व्यवसायातून चांगला नफा मिळत असल्याने मायकेलने त्याच्या 18 महिन्याच्या बाळाच्या नावे नुकतीच आठ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. आज मायकेलसोबत पाच कर्मचारी फुल टाइम काम करतात. त्याचा हा व्यवसाय ब्रुकलीन, मॅनहॅटनमध्ये आहे. येत्या काळात या व्यवसायाचा विस्तार न्यू जर्सी आणि मिडलटाउनमध्ये करण्याचं नियोजन मायकेल करत आहे. मायकेल डॉग वॉकरसाठी ग्राहकांकडून काही सेवा शुल्क घेतो. त्यात कुत्र्याला फिरवण्यासाठी ताशी 2000 ते 2500 रुपये, कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ताशी सुमारे 5000 रुपये आणि एका रात्रीसाठी कुत्र्याचा सांभाळ करण्याकरिता 5200 रुपये शुल्काचा समावेश आहे.

    वाचा - ऑनलाईन फसवणुकीचा नवीन फंडा; गुन्हेगारांनी एका ड्रायव्हरकडून भाड्यानं घेतली....

    मायकेलचा हा प्रवास खूपच रंजक आहे. 2019मध्ये जोसेफने डॉग वॉकर म्हणून पार्ट टाइम व्यवसाय सुरू केला. जोसेफ कुत्र्यांना एका उद्यानात फिरायला घेऊन जात असे. कुत्रे मायकेलच्या प्रत्येक सूचनेचं पालन करतात, अशी चर्चा तिथल्या लोकांमध्ये असायची. दरम्यान त्याला एका व्यक्तीने कुत्र्यांना फिरवण्याचं काम करशील का असा प्रश्न विचारला. त्यावर मायकेलने त्वरीत होकार दिला. तिथूनच मायकेलच्या जीवनाला कलाटणी मिळाली.

    यामुळे मायकेलचं उत्पन्न वाढू लागलं. उत्पन्न वाढत असल्याचं पाहून त्याने शिक्षक म्हणून नोकरी करणं सोडून दिलं आणि Parkside Pups नावाचा कुत्र्यांना फिरवण्याचा व्यवसाय सुरू केला. यातून त्याला अनेक क्लायंट मिळाले. हे क्लायंट त्याला कुत्र्याला अर्धा तास फिरवण्यासाठी 1500 रुपये देत असत. मायकेलने गेल्या वर्षी एक कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवलं; मात्र कोरोना महामारीमुळे त्याच्या कामावर परिणाम झाला. पण लोकांनी ऑफिसला जाणं सुरू करताच मायकेलचा व्यवसाय पुन्हा तेजीत आला. यानंतर मायकेलने एक अ‍ॅप लाँच केलं आणि अनेक कर्मचारी नियुक्त केले. सध्या मायकेलच्या कंपनीत पाच जण फुलटाइम काम करतात. मायकेलचा हा अनोखा व्यवसाय चर्चेचा विषय ठरला आहे.

    First published:

    Tags: Dog, Money