मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - धक्कादायक! विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकानेही सोडला जीव; शाळेत शिकवतानाच मृत्यू

VIDEO - धक्कादायक! विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकानेही सोडला जीव; शाळेत शिकवतानाच मृत्यू

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

विद्यार्थ्यापाठोपाठ शिक्षकाचाही मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Andhra Pradesh, India

अमरावती, 05 मार्च :  शुक्रवारी हैदराबादमधील एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ताजी असतानाच शिक्षकाच्याही मृत्यूची बातमी आली. आंध्र प्रदेशमध्ये शनिवारी एका शिक्षकाचा शिकवता शिकवता मृत्यू झाला आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी शिक्षकाच्या मृत्यूच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे.

आंध्र प्रदेशच्या बापटला जिल्ह्यातील इन्कोलू गावातील 45 वर्षांचे वीरी बाबू, एक शिक्षक आहेत. वाकावारी पालेम गावातील सरकारी शाळेत ते शिक्षक होते. शनिवारी ते शाळेत गेले होते. सकाळी वर्गात शिकवत असताना अचानक कोसळले. शिक्षकाची अवस्था पाहून विद्यार्थीही घाबरले. त्यांनी तात्काळ इतर शिक्षकांना याची माहिती दिली. अॅम्ब्युलन्सने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाला.

Shocking! घास तोंडात आणि शरीराने सोडले प्राण, व्यक्तीचा जेवताना अचानक गेला जीव; मृत्यूचा LIVE VIDEO

शुक्रवारी हैदराबाद जवळील CMR अभियांत्रिकी महाविद्यालयातील बीटेक प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये मित्रासोबत फिरत असताना हा विद्यार्थी अचानक जमिनीवर पडला. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

फुटेजमध्ये विद्यार्थी कोसळण्याआधी त्याची पावलं वाकडी पडताना दिसत आहेत. पडल्यानंतर त्याचे मित्र त्याला उचलण्यासाठी धावले. हा विद्यार्थी मूळचा राजस्थानचा होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र वाचवतं आलं नाही.

तशा या दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत. पण तरी शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही एकाच पद्धतीने मृत्यूने गाठलं आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी शिक्षकाचाही मृत्यू झाला आहे, त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

First published:
top videos

    Tags: Andhra pradesh, Death, Health, Heart Attack, Lifestyle, Student, Teacher, Viral, Viral videos