Viral : ‘बायको त्रास देत आहे?’, 'इथे' मिळेल फुकट चहा!

Viral : ‘बायको त्रास देत आहे?’, 'इथे' मिळेल फुकट चहा!

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक ‘ बेवफा चायवाला’ (Bewafa chai wala) व्हायरल (Viral) झाला आहे. ‘कालू बेवफा चायवाला’ असं या त्याच्या स्टॉलचं नाव आहे. या स्टॉलवर वेगवेगळ्या अजब नावाचा चहा मिळतो.

  • Share this:

दिल्ली, 21 डिसेंबर :  सध्याच्या थंडीच्या दिवसात चहाच्या स्टॉलवर (Tea Stall) गर्दी वाढत आहे. अनेकांना तर चहाचं अगदी व्यसन असते. त्यांना सकाळी डोळे उघडले की चहा हवा असतो. तर काहींना ऑफिसमध्ये काम करताना, अभ्यास करताना, रात्री झोप उडावी म्हणून  अशा कोणत्याही कारणांमुळे चहाची सवय असते. ‘चहाबाज’ मंडळींची ही आवड लक्षात घेऊन सध्या वेगवेगळे ब्रँड चहा उद्योगात उतरले असून ते चांगला व्यवसाय करत आहेत.

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक ‘ बेवफा चायवाला’ (Bewafa chai wala)  व्हायरल (Viral) झाला आहे. ‘कालू बेवफा चायवाला’ असं त्याच्या स्टॉलचं नाव आहे. या स्टॉलवर वेगवेगळ्या अजब नावांचा चहा मिळतो.

प्रत्येक मुडप्रमाणे मिळतो चहा!

या चहावाल्याचं पोस्टर मोठं बोलकं आहे. हे पोस्टर पाहणाऱ्या व्यक्तीचे पाय त्याच्या दुकानापाशी थबकतात. कुणी पोस्टर समोर सेल्फी काढतो. तर कुणी आपल्या मुडला शोभेल अशा चहाची ऑर्डर करतो.

प्रेमभंग झाल्यावर, प्रेमी जोडप्यांसाठी, एकटं वाटत असेल तर, मनासासारखा जोडीदार मिळावा म्हणून असा कोणत्याही प्रकारच्या तुमच्या मुडसाजेसा चहा या स्टॉलवर मिळतो, असा दावा या पोस्टरवर करण्यात आला आहे. प्रेमभंग झालेल्या चहाबाजांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी बनवण्यात येणाऱ्या चहाची किंमत फक्त पाच रुपये आहे.

पत्नी पीडितांना फुकट चहा

‘कालू चायवाला’ स्टॉलवरची हा सर्वात लोकप्रिय चहा आहे. बायको त्रास देत असलेल्या पुरुषांना इथे फुकट चहा मिळतो. पण त्यासाठी ग्राहकाने पत्नीसह चहा स्टॉलवर येण्याची अट आहे. नवरा-बायकोमधील भांडणाचं प्रात्याक्षिक (Demo) दाखवले तरच फुकट चहा मिळतो.

सोशल मीडियावर या चहावाल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्याच्या हटके पोस्टरवर आणि तितक्याच हटके कल्पनेवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. हा स्टॉल मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये असल्याचा दावा काहींनी केला आहे.

Published by: News18 Desk
First published: December 21, 2020, 10:31 AM IST

ताज्या बातम्या