दीव, 18 मे: मागील तीन चार दिवसांपासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीला तौत्के चक्रीवादळाचा (Tautkae Cyclone) जबरदस्त फटका बसला आहे. अरबी समुद्रात (Arabian sea Cyclone) निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील शहरांना आणि अरबी समुद्रातील लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दमन दीव या बेटांना जबरदस्त फटका बसला आहे. काल मुंबईत (Mumbai) झालेल्या तुफान पावसानं घरावरचं छत उडून गेल्यानं अनेकांचे संसार उद्धवस्त केले आहेत. तर काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.
अशातच दीव याठिकाणी तौत्के चक्रीवादळानं (Tauktae cyclone in Diu) तर कहरच केला आहे. येथील एका पेट्रोल पंपाचा (Petrol pump) व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. ज्यावरून दीवमध्ये चक्रीवादळानं लोकांची काय अवस्था केली असेल, हे स्पष्ट होतं आहे. चक्रीवादळामुळे दीव येथील एका पेट्रोल पंपाच प्रचंड नुकसान झालं आहे. येथील अगदी विजेच्या खांबापासून पेट्रोल पंपावरील मजबूत छतही अस्ताव्यस्त झालं आहे. पंपावरील विजेचे खांब वाकून पडले आहेत. तर पंपावरील ऑफिसचंही बरंच नुकसान झालं आहे.
दीवमध्ये तौत्के चक्रीवादळाचा रुद्रावतार, वेगवान वाऱ्यामुळे पेट्रोल पंपाची भयानक अवस्था... pic.twitter.com/TXgarFIhhu
— Ravindra (@i_am_Ravindra1) May 18, 2021
दुसरीकडे, मुंबईच्या समुद्री भागात 175 किलोमिटर दूर अंतरावर असणाऱ्या हीरा ऑयल फील्ड्सजवळ अडकलेलं एक भारतीय जहाज P-305 समुद्रात बुडालं आहे. भारतीय नौदलानं खवळलेल्या समुद्रातून 146 लोकांना सुखरूप वाचवलं. पण अजूनही 170 पेक्षा जास्त लोकं अजून बेपत्ता आहेत.
हे ही वाचा-Cyclone Tauktae: पत्त्यांप्रमाणे कोसळला भलामोठा टॉवर, पाहा थरारक VIDEO
याव्यतिरिक्त खवळलेल्या समुद्रात याच भागात आणखी एक प्रवासी जहाज देखील अडकलं आहे. या जहाजावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी INS कोलकाताला पाठवलं आहे. या जहाजावर 137 लोकं अडकलेली होती. त्यातील 38 जणांना सुखरुप बाहेर काढले आहे. 'तौत्के' चक्रिवादळ तूर्तास शमलं असलं तरी खोल समुद्रात मात्र अजूनही वातावरण प्रचंड प्रतिकूल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyclone, Live video viral