मराठी बातम्या /बातम्या /Viral /

धक्कादायक! शारिरीक संबंध ठेवताना तांत्रिकाने जोडप्यावर फेकलं फेवीक्विक आणि...

धक्कादायक! शारिरीक संबंध ठेवताना तांत्रिकाने जोडप्यावर फेकलं फेवीक्विक आणि...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

भालेश जोशी नावाच्या तांत्रिकाने एक अघोरी प्रकार केला आहे. ज्याअंतर्गत त्याला अटक देखील करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई २६ नोव्हेंबर : आपण नेहमीच म्हणतो की जग फार पुढे गेलं आहे. पण असं असलं तरी देखील भारतातील काही भागात लोक तंत्र-मंत्रासारख्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. गोष्टींवर श्रद्धा ठेवावी, यामुळे आपल्याला पॉझिटीव्ह एनर्जी मिळते. ज्यामुळे एक वेगळंच बळ मिळतं आणि आपण आयुष्यात पुढे देखील जातो. पण अंधश्रद्धा नेहमीच सगळ्याचा नाश करते. यासंबंधीत अनेक उदाहरण तुम्ही ऐकले असतील. भारतातील आणखी एक असंच प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून तुम्हाला विश्वास ठेवणं देखील कठीण जाईल.

हा प्रकरण उदयपूरच्या गोगुंडा पोलीस स्टेशन परिसरातून समोर आला आहे. येथे भालेश जोशी नावाच्या तांत्रिकाने एक अघोरी प्रकार केला आहे. ज्याअंतर्गत त्याला अटक देखील करण्यात आली आहे.

हे ही वाचा : पहाटे ३ वाजता हॉस्पिटलमध्ये 'भूताची एन्ट्री'? Viral Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गोगुंडा पोलिसांना जंगलात दोन मृतदेह सापडले. राहुल मीना (शिक्षक) आणि सोनू कुंवर अशी या दोन मृतदेहांची नावे आहेत. पोलिसांना पूर्णत: रक्ताने माखलेल्या आणि अर्धनग्न अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला आहे. या केसचा तपास घेत असताना पोलिसांसमोर धक्कादायक माहिती समोर आली.

सोनू कुंवर आणि राहुल मीना, (अनुक्रमे)

राहुल आणि सोनू या दोघांचे विवाहबाह्य संबंध होते, त्यांना एकत्र येण्यासाठी वशीकरणाची मदत घ्यायची होती, अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली. त्यासाठी गावात तंत्र विद्या म्हणून काम करणाऱ्या ५२ वर्षीय भालेश जोशी याची या दोघांनी भेट घेतली.

पण सोनूला पाहाताच तांत्रिक तिच्या प्रेमात पडला. ज्यामुळे त्याला देखील सोनूशी जवळीक वाढवायची होती. राहुलला ही गोष्ट कळाली. त्याने या तांत्रिकाला गावात बदनामी करण्याची धमकी दिली.

ज्यामुळे बदनामीसा घाबरुन भेलेशने या दोघांना ही संपवलं. वशीकरणाचा मंत्र देण्याच्या बहाण्याने भालेशने त्या दोघांनाही जंगलात बोलावले. मग त्याने दोघांनाही (राहुल आणि सानू) शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. या दरम्यान संधी मिळताच त्याने फेविक्विक त्यांच्यावर फेकला. ज्यामुळे हे दोघे एकमेकांना चिकटून राहिले. ज्यानंतर एकमेकांना वाचवण्याचा ते अयशस्वी प्रयत्न करत राहिले. यानंतर भालेशने दोघांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली.

First published:

Tags: Couple, Shocking news, Social media, Top trending, Viral