Home /News /viral /

VIDEO : काय आयडिया काढली! कोरोनाला हरवण्यासाठी तयार केला सॅनिटायझर बोगदा

VIDEO : काय आयडिया काढली! कोरोनाला हरवण्यासाठी तयार केला सॅनिटायझर बोगदा

बाजारात जाण्याआधी आणि नंतर सॅनिदायझर बोगद्याचा वापर नाही केला तर...

    तिरुपूर, 03 एप्रिल : भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. या लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असणार आहे. या कालावधील लोकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. केवळ आवश्यक सामान घेण्यासाठी बाहेर पडू शकतात. मात्र अद्याप देशात लोकं याकडे गांभीर्याने पाहत नाही आहेत. त्यामुळं अखेर प्रशासनाने यावर एक कल्पना काढली आहे. तमिळनाडूमधील तिरुपूर जिल्ह्यात चक्क एक बोगदा तयार करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे एकाचवेळा खुप लोकं भाजी आणि इतर आवश्यक सामना घेण्यासाठी घराबाहेर पडतात. यासाठी बाजाराच्या प्रवेशद्वाराजवळच हा बोगदा तयार करण्यात आला आहे. त्यामुळं जो कोणी बाजारात येईल त्यांना या बोगद्यातून जावे लागते. या बोगद्यामध्ये लोकांना सॅनिटाइझ केले जाते. लोकं सध्या सोशल मीडियावर या कल्पनेचे कौतुक करत आहेत. तिरुपूर जिल्ह्यातील डीएम यांनी या सॅनिटायझर बोगद्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी बाजारात जाण्यापूर्वी लोकांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. तर लोकांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर मार्केटमध्ये प्रवेश करताना आणि निघताना लोकांना हात धुण्याची सोयही करण्यात आली आहे. देशातील इतर राज्यांमध्येही असे बोगदे तयार करण्यात यावेत, अशी मागणी ट्विटरवर केली जात आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या