हत्तीनं सोडली कायमची साथ, वन अधिकाऱ्याला कोसळलं रडू; भावुक करणारा VIDEO
एकीकडे हत्तीवर (elephant) पेटता टायर फेकल्यानं संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे हत्तीच्या मृत्यूनंतर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमुळे डोळ्यात पाणी आलं आहे.
चेन्नई, 23 जानेवारी : एकीकडे हत्तीवर (elephant) पेटता टायर फेकता टायर फेकल्याचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) झाला. माणसाच्या क्रूरतेचा हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला जाऊ लागला. तर दुसरीकडे अशाच हत्तीसाठी रडणाऱ्या एका वन अधिकाऱ्याचा भावुक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तामिळनाडूतीलच (Tamilnadu) या दोन्ही घटना.
हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासाठी रडणाऱ्या एका वन अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. IFS अधिकारी रमेश पांडे यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हत्तीच्या मृत्यूचा शोक अधिकाऱ्याला अनावर झाला आहे.
It’s really moving to see this tearful bid adieu to an elephant by his companion forester at Sadivayal Elephant Camp in Mudumalai Tiger Reserve, Tamil Nadu. #GreenGuards#elephants
हा व्हिडीओ तामिळनाडूच्या मुदुमलाई टायगर रिझर्व्हमधील सदावियल एलिफंट कॅम्पमधील आहे. जिथं एका हत्तीचा मृत्यू झाला आहे. मृत हत्तीला एका गाडीत ठेवण्यात आलं आहे. त्याची सोंड हातात धरून वन अधिकारी रडतो आहे. या हत्तीसोबत त्याची चांगलीच मैत्री जमली होती. पण त्यानं अशी कायमची साथ सोडली हे त्या अधिकाऱ्याला सहन होत नाही. आपला मित्र आता आपल्यासोबत नाही ही कल्पनाही त्याला करवत नाही. त्याच्या आयुष्यात एक पोकळीच निर्माण झाली आहे.
एकिकडे हा भावूक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, तर दुसरीकडे तामिळनाडूमध्येच एका हत्तीवर पेटता टायर फेकल्याचा व्हिडीओही व्हायरल होऊ लागला. तामिळनाडूच्या निलगिरीमधील मसिनागुडी क्षेत्रात ही भयंकर घटना घडली. रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी हत्तीवर जळता टायर फेकला आणि जो त्याच्या कानात अडकला होता. सैरभैर झालेला हत्ती माणसाच्या क्रुरतेपुढे त्यावेळी हतबल झाला होता.
ये दर्दनाक तस्वीर तमिलनाडु के नीलगिरि की है, जहां एक रिज़ॉर्ट के कर्मचारियों ने एक हाथी को आग के हवाले कर दिया। उसके ऊपर जलते हुए टायर फेंके। जंगल के अधिकारियों को जब ये हाथी मिली तब उसके कानों से खून निकल रहा था। बचाव की तमाम कोशिशों के बावजूद 18 जनवरी को हाथी की मौत हो गई। pic.twitter.com/MBQT16sPQr
जंगलातील अधिकाऱ्यांना जेव्हा हत्ती सापडला, तेव्हा त्याच्या कानातून रक्त येत होते. मुदुमलाई टायगर रिझर्व्हमध्ये या हत्तीला उपचारासाठी नेण्यात आलं होतं. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण त्याचा जीव वाचला नाही. 18 जानेवारी रोजी या हत्तीने प्राण सोडले.