मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कसली ती हौस! जमिनीवर लॉकडाऊन, कपलनं आकाशात झेप घेत 130 पाहुण्यांच्या उपस्थितीत बांधली लग्नगाठ

कसली ती हौस! जमिनीवर लॉकडाऊन, कपलनं आकाशात झेप घेत 130 पाहुण्यांच्या उपस्थितीत बांधली लग्नगाठ

मुलीकडील लोकांनीही हा प्रस्ताव मंजूर करत, आपल्या मुलीचं लग्न त्या वऱ्हाडी म्हणून आलेल्या मुलाशी लावून दिलं.

मुलीकडील लोकांनीही हा प्रस्ताव मंजूर करत, आपल्या मुलीचं लग्न त्या वऱ्हाडी म्हणून आलेल्या मुलाशी लावून दिलं.

सरकारनं लग्नसमारंभासाठी विविध नियम लागू केले आहेत. अशा परिस्थितीमध्ये एका कपलनं थेट आकाशात झेप घेत विवाह (Marriage) करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या नातेवाईकांसोबत विमानातच त्यांनी लग्नगाठ बांधली.

  • Published by:  Kiran Pharate

चेन्नई 24 मे : सध्या संपूर्ण देश कोरोना (Coronavirus) महामारीचा सामना करत आहे. या महामारीविरोधात लढण्यासाठी बहुतेक राज्यांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आलं आहे. त्यामुळे, लग्नाच्या सिझनमध्येही लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण, सरकारनं लग्नसमारंभासाठी विविध नियम लागू केले आहेत. अशा परिस्थितीमध्ये एका कपलनं थेट आकाशात झेप घेत विवाह (Marriage) करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या नातेवाईकांसोबत विमानातच त्यांनी लग्नगाठ बांधली.

हा अनोखा विवाहसोहळा पार पडला आहे तमिळनाडूतील मदुरै येथे. थुथुकुडीला जात विमानात नातेवाईकांच्या उपस्थितीत या कपलनं लग्नगाठ बांधली आहे. तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर 24 मे ते 31 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अशात या काळात विवाहसोहळ्याचं आयोजन केलेल्या जोडप्यांनी मंदिरांबाहेरच एकत्र येत लग्नगाठ बांधली. कारण, लॉकडाऊनमध्ये कोणत्याही सोहळ्याच्या आयोजनाला परवानगी देण्यात आलेली नाही.

याच कारणामुळे या कपलनं चार्डर्ट विमानात (Charter Flight) वेगळ्या पद्धतीनं लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. मदुरैच्या राकेश आणि दीक्षानं एक विमान भाड्यानं घेतलं आणि विमान आकाशात असतानाच 130 नातेवाईकांसमोर लग्नगाठ बांधली. या जोडप्याचं लग्न दोन दिवस आधीच झालं होतं. मात्र, राज्यात एका दिवसाच्या सुट्टीची घोषणा होताच त्यांनी आपला लग्नसोहळा खास बनवण्याचं ठरवलं.

या जोडप्यानं असा दावा केला, की विमानात लग्नसोहळ्यासाठी उपस्थित असणारे सर्व लोक त्यांचे नातेवाईक होते आणि या सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांनी विमानात प्रवेश केला होता.

तमिळनाडूमध्ये कोरोनाचा वाढता प्रसार पाहाता मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध आणि एक आठवडा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान 23 मे रोजी रात्री ९ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी देत एका दिवसासाठी सूट देण्यात आली होती. मात्र, यावेळी राज्यभरातील बाजारांमध्ये एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे अनेक सवाल उपस्थित झाले.

First published:

Tags: Lockdown, Marriage, Wedding