मराठी बातम्या /बातम्या /Viral /DJ साठी थेट खाकी वर्दीशी भिडला चिमुकला, हिंमत पाहून पोलिसानेही थोपटली पाठ; VIDEO VIRAL

DJ साठी थेट खाकी वर्दीशी भिडला चिमुकला, हिंमत पाहून पोलिसानेही थोपटली पाठ; VIDEO VIRAL

लहान मुलाची हिंमत पाहून पोलीसही थक्क झाले.

लहान मुलाची हिंमत पाहून पोलीसही थक्क झाले.

लहान मुलाची हिंमत पाहून पोलीसही थक्क झाले.

हैदराबाद, 18 ऑक्टोबर : लहानांपासून मोठ्यांपर्यंत डीजेवर (DJ) थिरकायला बहुतेकांना आवडतं. सध्या पार्टी असो, कोणता कार्यक्रम असो वा सण असो, सगळीकडे डीजे ऐकायला मिळतो. पण डीजे वाजवण्यासाठीही एक विशिष्ट वेळ ठरलेली असते. नियमांचं उल्लंघन केल्याचं पोलीस कारवाईला सामोरं जावं लागतं. पण तरी काही ठिकाणी भरपूर वेळ डीजे ठेवला जातो मग शेवटी तो बंद करण्यासाठी पोलिसांनाच तिथं यावं लागतं. अशाच एका पोलिसाशी चक्क भिडला तो एक चिमुकला (Child argued with police for dj).

डीजेसाठी एक लहान मुलगा पोलिसांशी भांडताना दिसतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. मोठ्या माणसांनाही जे जमलं नाही ते या लहान मुलाने करून दाखवलं आहे. एवढ्याशा मुलाने जी हिंमत दाखवली आहे, ते पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. अगदी पोलिसानेही या लहानग्याची हिंमत पाहून त्याला दाद दिली आहे, त्याची पाठ थोपटली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडीओ तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जातं आहे.  सदाशिवपेट शहरात देवीच्या मूर्तीचं विसर्जन होतं. पोलिसांनी डीजेला परवानगी दिली नव्हती. तरी डीजे वाजवण्यात आला आणि पोलीस तिथं पोहोचले. मोठी माणसं तर घाबरून बाजूलाच राहिली. पण या मुलाने मात्र पोलिसांशी हुज्जत घातली. डीजेला परवानगी का देत नाही, याचंं कारण त्याने विचारलं.

हे वाचा - उत्तरपत्रिका पाहून शिक्षक कोमात; असं काय लिहिलंय विद्यार्थ्याने तुम्हीच पाहा

पोलिसाला भिडणाऱ्या या मुलाचं वय अवघं सहा वर्षे आहे. त्याची हिंमत पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. त्याच्या आजूबाजूला असलेली मोठी माणसं तर त्याच्याकडे पाहतच राहिली आहे. अगदी पोलीससुद्धा त्या मुलांची डेअरिंग पाहून हैराण झाले आहेत. ते मुलाचं बोलणं शांतपणे ऐकून घेत आहेत. त्याची डेअरिंग पाहून ते

First published:
top videos

    Tags: Police, Small child, Tamilnadu, Viral, Viral videos