हैदराबाद, 21 डिसेंबर : लहनांपासून तरुणांपर्यंत फुगे पाहिले की फोडायचा मोह आजही अनेकांना आवरत नाही. फुगे दिसले किंवा कुणालातरी घाबरवण्यासाठी देखील फुगे फोडण्याची मजा काही वेगळीच असते. फुगे फोडण्याचा आनंद आणि त्यातली गंमत मंत्र्यांनी देखील घेतल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उद्घाटन समारंभासाठी तमिळनाडूचे मंत्री राजेंद्र भालाजी उपस्थित होते. त्यावेळी फुगे पाहून त्यांना देखील बालपणीची आठवण झाली असावी आणि मोह आवरला नाही. त्यांनी कात्री घेऊन फुगे फोडले आणि मग उद्घाटन केले. या सोहळ्यादरम्यान त्यांनी फुगे फोडण्याचा आनंद घेतला आहे. त्यांचा फुगे फोडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे वाचा-हत्तीमागे लपून वाघ शोधतोय सावज, असा VIDEO तुम्ही कधीही पाहिला नसेल
तामिळनाडूचे मंत्री राजेंद्र भालाजी शिवकालीतील अम्मा मिनी क्लिनिकचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचले. उद्घाटनाच्या वेळी आजूबाजूला लावलेले फुगे पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी हे फुगे फोडून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. आधी फुगे फोडले आणि मग उद्घाटन केलं. त्यांच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.