मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: महिला रिपोर्टरचा तो प्रश्न ऐकून जोरजोरात हसू लागले तालिबानी; मग कॅमेराच बंद करायला सांगितला

VIDEO: महिला रिपोर्टरचा तो प्रश्न ऐकून जोरजोरात हसू लागले तालिबानी; मग कॅमेराच बंद करायला सांगितला

व्हिडिओमध्ये एका महिला रिपोर्टरनं विचारलेल्या प्रश्नावर तालिबानी (Viral Video of Talibani) जोरजोरानं हसताना दिसतात. यात या रिपोर्टरनं तालिबानींना महिलांच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल आणि त्यांना मिळणाऱ्या मतांबद्दल सवाल केला होता.

पुढे वाचा ...
    काबूल 18 ऑगस्ट : अफगाणिस्तानात तालिबाननं आता पूर्णपणे कब्जा मिळवला आहे (Taliban Regain Control of Afghanistan). त्यामुळे, अफगाणिस्तानातील प्रत्येक लहान मोठ्या हालचालीबद्दल जाणून घेण्याची संपूर्ण जगाची इच्छा आहे. यातच आता एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Talibani) होत आहे. यामध्ये एका महिला रिपोर्टरनं विचारलेल्या प्रश्नावर तालिबानी जोरजोरानं हसताना दिसतात. यात या रिपोर्टरनं तालिबानींना महिलांच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल आणि त्यांना मिळणाऱ्या मतांबद्दल सवाल केला होता. VIDEO: हवेतच लष्काराच्या विमानानं घेतला पेट; कॅमेऱ्यात कैद झाला तो थरारक क्षण व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ भरपूर जुना आहे. जेव्हा तालिबानींनी 1996 आणि 2001 च्या दरम्यान अफगाणिस्तानावर कब्जा (Afghanistan Crisis) केला होता. मात्र, तालिबानींच्या तेव्हाच्या आणि आताच्या वागण्यात भरपूर फरक झाला आहे. या जुन्या व्हिडिओमध्ये महिला रिपोर्टरनं तालिबानींना प्रश्न विचारला होता, की महिला नेत्यांना अफगाणी मत देतील का? त्यांनाही निवडणूक लढवण्याची संधी मिळेल का? यावर तालिबानी मोठमोठ्यानं हसू लागले आणि म्हणाले, की कॅमेरा समोरून हटवा. अनेक वर्षांनंतर आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. पार्कमध्ये खेळताना दिसले तालिबानी; गाड्यांवर, घोड्यावर बसून मस्ती करतानाचे VIDEO डॉक्यूमेंटरीच्या एपिसोडमधील ही छोटीशी क्लिप आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे, कारण आता पुन्हा एकदा तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. मंगळवारी तालिबाननं घेतलेल्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं आहे, की मागील 20 वर्षांच्यात तालिबान भरपूर बदललं आहे. त्यांनी असंही म्हटलं, की इस्लामी काद्यांनुसार महिलांना स्वातंत्र्य असेल. यासोबतच संघटनेनं देशात बुर्खा अनिवार्य करणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. पण त्यांना हिजाब घालावा लागेल, असं तालिबाननं सांगितलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Afghanistan, Live video, Taliban

    पुढील बातम्या