जंगलराज! शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला तालिबानी मारहाण; VIDEO मध्ये दिसतोय क्रुरतेचा कळस

जंगलराज! शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला तालिबानी मारहाण; VIDEO मध्ये दिसतोय क्रुरतेचा कळस

या तरुणाला इतकं मारलं की त्याची शुद्धचं हरपली..पण कोणीच पुढे येऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही

  • Share this:

भोपाळ, 13 ऑक्टोबर : जबलपुरमधून एका धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून देशातील क्रुरता वाढत असल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एका लोडिंग ऑटोने स्कूटीवरुन जाणाऱ्या तरुणीला मागून धडक दिली. यानंतर तरुणीने फोन करून आपल्या नातेवाईकांनी बोलावले. यानंतर आलेल्या तरुणांनी रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. यावेळी रिक्षाचालकाला तालिबानी पद्धतीने मारहाण करण्यात आली.

अनुराग द्वारी नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही मुलं रिक्षाचालकाला बेदम मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. त्यांनी तरुणाला खूप मारहाण केली व त्यानंतर त्याला दुचाकीच्या मागे आडवं बसवलं व त्याला घेऊन गेले. हे तरुण या भागातील गुंड असल्याची माहिती समोर आली आहे. येथील प्रत्यक्षदर्शीने हा व्हिडीओ शूट केला आहे.

al

ऑटो चालकाला इतकी मारहाण करण्यात आली की त्यात त्याची शुद्ध हरपल्याचे दिसत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा येथील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. जर अशा प्रकारची गुंडशाही सुरू राहिली तर त्याचा वटवृक्ष होण्यास वेळ लागत नाही, त्यामुळे वेळीच आरोपींना बेड्या घाला अशी मागणी केली जात आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: October 12, 2020, 11:54 PM IST

ताज्या बातम्या