मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ऑफिसमध्ये या गादी घ्या आणि निवांत झोपा; 'या' कंपनीने दिली अनोख्या नोकरीची ऑफर

ऑफिसमध्ये या गादी घ्या आणि निवांत झोपा; 'या' कंपनीने दिली अनोख्या नोकरीची ऑफर

फिस म्हटलं की कामाचा ताण तसंच अंतर्गत राजकारणामुळे अनेकजण पुरते वैतागून जातात. दररोजचं एकच रटाळ आयुष्य असल्याने त्यात काहीतरी बदल हवा, असं बहुतांश जणांना वाटत असतं.

फिस म्हटलं की कामाचा ताण तसंच अंतर्गत राजकारणामुळे अनेकजण पुरते वैतागून जातात. दररोजचं एकच रटाळ आयुष्य असल्याने त्यात काहीतरी बदल हवा, असं बहुतांश जणांना वाटत असतं.

फिस म्हटलं की कामाचा ताण तसंच अंतर्गत राजकारणामुळे अनेकजण पुरते वैतागून जातात. दररोजचं एकच रटाळ आयुष्य असल्याने त्यात काहीतरी बदल हवा, असं बहुतांश जणांना वाटत असतं.

 मुंबई, 10 ऑगस्ट-  ऑफिस म्हटलं की कामाचा ताण तसंच अंतर्गत राजकारणामुळे अनेकजण पुरते वैतागून जातात. दररोजचं एकच रटाळ आयुष्य असल्याने त्यात काहीतरी बदल हवा, असं बहुतांश जणांना वाटत असतं. खूप कमी जणांना त्यांच्या ऑफिसमध्ये आवडीप्रमाणे काम मिळतं. पण अमेरिकेतील एका कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना जे काम दिलं आहे ते ऐकून आश्चर्याचा सुखद धक्का बसू शकतो. कार्यालयात दाखल होताच कर्मचाऱ्यांना गादी  दिली जाते. त्यावर पूर्ण झोप घ्यायची आणि घरी निघून जायचं, असं या नोकरीचं स्वरूप आहे. विशेष म्हणजे यासाठी चांगला पगारही दिला जातो. सर्वात अनोखी नोकरी देणाऱ्या कंपनीच कॅस्पर असं नाव आहे. ही कंपनी गाद्या तयार करण्याचं काम करते. गाद्यांचा दर्जा कसा आहे हे तपासण्याची गरज असल्याने ही नोकरी उपलब्ध केली गेली आहे. भरपूर झोप घेणाऱ्या व्यक्तीचाच या पदासाठी कंपनीकडून नियुक्तीसाठी विचार केला जातो. कंपनीत तरुणांना नोकरीची संधी अधिक कंपनीच्या मते, 18 वर्षांवरील तरुण नोकरीसाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी 11 ऑगस्ट 22 ही शेवटची तारीख असणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या तरुणांनी ‘स्लीप स्किल’चा छोटा व्हिडिओ तयार करून अर्जासोबत पाठवावा. नव्या गादीवर झोपताना अनुभव कसा होता, हे तरुणांनी या व्हिडिओत सांगणं अपेक्षित आहे. कामाचं स्वरूप कसं असेल नोकरी देताना कंपनीने काही मजेशीर नियम व अटी ठेवल्या आहेत. यात ज्या उमेदवारांची कर्मचारी म्हणून निवड होईल ते ड्युटीच्या वेळी पायजमा घालून झोपू शकतात. झोपण्यासाठी त्यांना दररोज नवीन गादी उपलब्ध केली जाणार आहे. त्यांना कामाच्या वेळेत सवलतही दिली जाणार आहे. (हे वाचा: सात वर्षांत पहिल्यांदाच ऑफिसला पोहोचायला 20 मिनिटं झाला उशीर; कर्मचाऱ्याची गेली नोकरी ) ट्विटरवर अनेकांच्या मजेशीर प्रतिक्रिया कॅस्पर कंपनीने #CasperSleepers या नावाने ट्विटरवर नोकरीसंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात एक लिंक दिली असून, नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या ट्विटवर नेटिझन्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘नोकरीसाठी मी अर्ज केला असून, माझ्यासारखी दुसरी झोपाळू व्यक्ती तुम्हाला शोधूनही सापडणार नाही’, असं एका तरुणीनं म्हटलं आहे. तर, आधीच चांगली झोप घेणाऱ्या व्यक्तीला पैसे देण्याऐवजी निद्रानाश असलेल्या व्यक्तीस झोपण्यासाठी प्रवृत्त करून दाखवा, असं आव्हान दुसऱ्या एका युजरने कंपनीला दिलं आहे. आणखी एका युजरने तर चक्क मांजरीचा फोटो टाकून या पदासाठी मांजरीचा विचार होऊ शकतो का? अशी विचारणा केली आहे. रिकी नावाच्या युजरने प्रतिक्रिया देण्याऐवजी लिफ्ट, पार्क, स्वीमिंग पूल, हॉटेल, सोफा, मॉल अशा विविध ठिकाणी झोपलेला स्वत:चा व्हिडिओच शेअर केला आहे. त्यावर त्याने ‘से लेस’  इतकंच कॅप्शन दिलं आहे.
First published:

Tags: Career, Job alert, Viral news

पुढील बातम्या