Car Parking Sensor नसेल तेव्हा काय होईल? व्हायरल झाला मजेशीर VIDEO

Car Parking Sensor नसेल तेव्हा काय होईल? व्हायरल झाला मजेशीर VIDEO

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कारसाठी पार्किंग सेन्सर (car parking sensor) किती महत्त्वाचे असतात हे कळून येतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : कार पार्किंगसाठी सेन्सर (Sensor) किती आवश्यक आहे, हे सर्वांत जास्त कोणाला कळत असेल, तर ज्यांच्या कारला सेन्सर नाही त्यांना. गमतीचा भाग सोडून दिला, तरी कार पार्किंग सेन्सर ही किती आवश्यक गोष्ट आहे, याचा अंदाज तुम्हाला असेलच. अनेकदा छोट्या, चिंचोळ्या जागेत कार पार्क (Car Parking) करताना तुम्हाला या गोष्टीचा अंदाज आला असेल. मोठमोठ्या इमारतींमध्ये ज्या त्या फ्लॅट नंबरसाठी पार्किंगची जागा राखीव असते. त्या जागेत पार्किंग योग्य पद्धतीने करता येण्यासाठी पार्किंग सेन्सर (Parking Sensor) खूप उपयुक्त ठरतात. समजा, तुम्हाला कार पार्किंग सेन्सरचं महत्त्व माहिती नाही, तर हा मजेदार व्हिडिओ पाहिल्यावर ते तुमच्या नक्की लक्षात येईल.

या व्हिडिओमध्ये सेन्सर नसलेली एक कार पार्क होत असताना दाखवण्यात आली आहे. त्या कारमध्ये एक माणूस गाडीच्या डिकीत झोपला असून, कार सेन्सरचं काम स्वतः करतो आहे. गाडी मागे येताना तो स्वतः आवाज काढतो आहे आणि कार कुठेही न लागता व्यवस्थितपणे पार्क होण्यासाठी मदत करतो आहे.

हा व्हिडिओ LADbible नावाच्या ट्विटर हँडलवरून सात जानेवारी रोजी ट्विट करण्यात आला आहे. आतापर्यंत तो व्हिडिओ दोन लाख 63 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

हे वाचा -  आता माझी सटकली! मान पकडताच कोंबड्याचा कुत्र्यावर हल्लाबोल; खतरनाक Fighting Video

पार्किंग सेन्सरचं काम अंतराच्या तत्त्वावर चालतं. कारपासून ठरवून दिलेल्या सुरक्षित अंतरापेक्षा जवळच्या टप्प्यात काहीही अडथळा आला, तर पार्किंग सेन्सर वाजायला लागतात. त्यामुळे धोका असल्याचं चालकाच्या लक्षात येतं आणि तो आवश्यक ती काळजी घेतो. अगदी गवताची काडी जरी मध्ये आली, तरी हा सेन्सर आपलं काम चोखपणे पार पाडतो. बऱ्याच कार्सचा पुढचा आणि मागचा शो प्लॅस्टिक अथवा फायबरपासून बनवलेला असतो. तो जरा जरी घासला गेला, तरी त्याची शोभा जाते. पुन्हा रंगवून घ्यायचं म्हटलं तर खर्च येतो आणि शिवाय अगदी तसाच रंग मिळेल, याचीही खात्री नसते. म्हणूनच कार पार्किंग सेन्सरची सुविधा आवश्यक आणि अत्यंत उपयुक्त आहे. त्याच्या जोडीला रिव्हर्स कॅमेराही नव्या कार्सना दिलेला असतो. त्यामुळे चालकाला डॅशबोर्डवर मागचं चित्रही दिसायला मदत होते.

हे वाचा - 70 फुटांवरून कोसळला ट्रक; पण ड्रायव्हरला खरचटलंही नाही; अपघाताचा LIVE VIDEO

सध्याच्या घडीला देशात उपलब्ध असलेल्या बहुतांश कार्समध्ये पार्किंग सेन्सरची सुविधा उपलब्ध आहे. मारुती, महिंद्रा, ह्युंडाई, किआ यांसारख्या कंपन्या फ्रंट आणि रिअर सेन्सरची सुविधा देतात. तुम्ही कार खरेदी करायचा विचार करत असाल, तर कार पार्किंग सेन्सर आहे की नाही, याची खात्री आधीच करून घ्या.

Published by: Aditya Thube
First published: February 11, 2021, 6:58 PM IST

ताज्या बातम्या