Home /News /viral /

मोफत इंटरनेटसाठी जोडप्याने घेतला 'हा' अजब निर्णय

मोफत इंटरनेटसाठी जोडप्याने घेतला 'हा' अजब निर्णय

मोफत इंटरनेट सुविधाचा लाभ घेण्यासाठी जोडप्यानं भन्नाट कल्पना शोधून काढली काय केलं वाचा सविस्तर.

    मुंबई, 20 ऑक्टोबर : मोफत इंटरनेट आणि वाय-फाय सुविधा मिळवण्यासाठी तुम्ही आतापर्यंत काय धडपड केली आहे. अनेकजण विविध मार्गांनी मोफत वाय-फाय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. यासाठी त्यांची वाटेल ते करायची तयारीदेखील असते. याच प्रकारचं एक जोडपं स्वित्झर्लंडमध्ये आढळून आलं आहे. या जोडप्यानी मोफत वाय-फाय मिळण्यासाठी आपल्या मुलीचं नाव चक्क इंटरनेट पुरवणाऱ्या कंपनीच्या नावावरून ठेवलं आहे. याविषयी ब्रिटनमधील मिररमध्ये आलेल्या वृत्तानुसार, Twifi या इंटरनेट पुरवणाऱ्या कंपनीने आपल्या वेबसाईटवर या संदर्भात एक जाहिरात टाकली होती. यामध्ये तुमच्या मुलाच्या जन्म दाखल्यासह अपत्याचा फोटो अपलोड करा आणि 18 वर्षं मोफत इंटरनेट सुविधा मिळवा, असं लिहिलं होतं. त्याचबरोबर जे जोडपं आपल्या बाळाचं नाव मुलगा असेल तर Twifius आणि मुलगी असेल तर Twifia असं ठेवेल त्यांना कंपनी 18 वर्ष मोफत इंटरनेट सुविधा देईल. 18 वर्षांपर्यंत किंवा ते बाळ वयात येईपर्यंत ही मोफत सेवा दिली जाईल असं कंपनीने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर एका जोडप्याने आपलं नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर ही ऑफर स्वीकारून आपल्या मुलीचे नाव Twifia असं ठेवलं. त्यांनी आपल्या मुलीच्या नावामध्ये हा शब्द वापरला असून 18 वर्षांपर्यंतचा वाय-फाय बिलाचे वाचणारे पैसे आम्ही आमच्या मुलीच्या नावानी बँक बचत खात्यात गुंतवणार आहोत. या पैशांचा उपयोग तिला भविष्यात कार किंवा इतर गोष्टी घेण्यासाठी होऊ शकेल, असं या जोडप्यानी सांगितलं. हे वाचा-VIDEO:..आणि दुर्गा अवतरली! अपहरण करणासाठी आलेल्या अज्ञातांना महिलेनं धू-धू धुतलं आपल्या या निर्णयामुळे या जोडप्याला खूप विचित्र वाटतं आहे. हे नाव जरा विचित्र वाटतं आहे, पण या नावामुळे तिच्या नावाला वेगळाच अर्थ येत असून मी खुश असल्याचं या मुलीच्या 35 वर्षीय पित्याने बोलताना सांगितले. या मुलीची आई म्हणाली, ‘हा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही दोघंही द्विधेत होतो. पण नंतर आम्ही विचार केला हे नाव आमच्या मुलीसोबत आयुष्यभर राहणार आहे तिला कसं वाटेल. पण इतर अनेक अजब नावं लोकं ठेवतात. आपल्याला ट्विफिया नावाची सवय झाल्यावर तेही गोड वाटू लागतं.’ या निर्णयाबाबत दोघांत दुमत होतं हे या जोडप्यानी मान्य केलं असून, मुलीच्या नावामध्ये त्यांनी आधी दोन नावं लावली असून मग ट्विफिया हे नाव वापरलं आहे. दरम्यान, इतर कुणीही या दोघांना पाठिंबा दिला नसला तरीदेखील कंपनीचा मालक फिलिप फॉस्च याने या जोडप्याला पाठिंबा दिला आहे. हा कंपनीच्या प्रतिष्ठेचा विषय असून भविष्यात कंपनी बंद पडली तरीदेखील ही मोफत सेवा ते स्वतः देणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या