VIDEO : फोटोसाठी पाण्यात उतरला तरूण, मागून आला 8 फूट लांब शार्क आणि...

VIDEO : फोटोसाठी पाण्यात उतरला तरूण, मागून आला 8 फूट लांब शार्क आणि...

  • Share this:

वाशिंगटन, 24 जून : सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं कुणाला आवडत नाही. पण कधीकधी प्रसिद्ध होण्यासाठी केलेले व्हिडीओ किंवा खेळ आपल्याच जीवावर बेतू शकतात याचा अंदाजही आपल्याला येत नाही. अमेरिकेतील डेलावेरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांमध्ये खूप गोंधळ उडाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार स्विमिंगपटू टीएमझेड शोसाठी फोटो काढत होता आणि तो व्हिडिओही बनवत होता. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की 8 फूट लांब शार्क मागून येतो आणि या तरुणावर हल्ला करत आहे. शार्क हल्ला कारणार तेवढ्यात या तरुणाच्या ती गोष्ट लक्षात येते.

या तरुणानं शार्क माशासोबत दोन हात केले आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. हा तरुण पोहत समुद्रकिनाऱ्यावर आला आणि त्याचा बदला घेण्यासाठी शार्कही मागोमाग आला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर बर्‍याच लोकांनी तक्रारी देखील केल्या आहेत. अशाप्रकारच्या घटनेचा निषेध म्हणून या व्यक्ती व फोटो घेणार्‍या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी 4 जून रोजी या ठिकाणी शार्कच्या हल्ल्यात 12 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 27, 2020, 6:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या