निलंबनावर निलंबन! बॉलिवूड गाण्यावरील VIDEO व्हायरल होताच वरिष्ठांकडून पुन्हा पोलिसाची शाळा..

निलंबनावर निलंबन! बॉलिवूड गाण्यावरील VIDEO व्हायरल होताच वरिष्ठांकडून पुन्हा पोलिसाची शाळा..

पहिलं निलंबन संपलं म्हणून सब-इन्स्पेक्टर आनंदात 'दिलबर दिलबर' या गाण्यावर नाचत होता.

  • Share this:

कराची, 13 जून : सोशल मीडियावर (Social Media) गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातील (Pakistan) एका सब-इन्स्पेक्टरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एका बॉलिवूड गाण्यावर ते नाचताना दिसत आहे. सब-इन्स्पेक्टर निलंबन संपल्यानंतर ड्युटी रुजू करण्यापूर्वी ते खूप खूश होते. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.

पुन्हा निलंबन

हा व्हायरल व्हिडीओ (Viral Video) पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी सब-इन्स्पेक्टराची शाळा घेण्यास विलंब लावला नाही आणि कारवाई करून सब-इन्स्पेक्टरला तत्काळ पुन्हा निलंबित करण्याचे आदेश दिले. सर्वात मजेशीर गोष्ट अशी आहे की ज्या मित्रांमुळे सब-इन्स्पेक्टर पहिल्यांदा निलंबित करण्यात आले होते, त्याच मित्र आणि सहकाऱ्यांमुळे त्यांचे दुसऱ्यांदा निलंबन करण्यात आले आहे. कारण ही पार्टी त्यांच्या त्याच मित्रांनी आयोजित केली होती.

हे ही वाचा-रस्त्यावर बसलेल्या गर्भवती गायीवर चढवला ट्रॅक्टर; धक्कादायक VIDEO पाहून हादराल!

कराचीतील एका ठाण्यात तैनात आहेत पोलीस निरीक्षक शाह

पाकिस्तानातील समाचार पत्र 'एक्सप्रेस ट्रिब्यून'नुसाप, सब-इन्स्पेक्टर यांचं नाव आबिद शाह (Aabid Shah) आहे. ते कराचीच्या लियाकताबाद पोलीस स्टेशनमध्ये तैनात आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आबिद शाह आपल्या मित्रांसह बॉलीवुडमधील हिट गाणं 'दिलबर, दिलबर, होश न खबर है' या डान्स करताना दिसत आहे. मित्रांमुळे पुन्हा निलंबन होईल याबाबत  आबिद यांना तरी कुठे ठाऊन होतं.

Published by: Meenal Gangurde
First published: June 13, 2021, 9:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या