Elec-widget

VIDEO : थाट तर बघा! बस चालवताना गिअर बदलण्यासाठी ठेवल्या मुली आणि...

VIDEO : थाट तर बघा! बस चालवताना गिअर बदलण्यासाठी ठेवल्या मुली आणि...

बस चालवणारा एक आणि गिअर बदलणारा एक. असा VIDEO तुम्ही पाहिला नसेल.

  • Share this:

केरळ, 19 नोव्हेंबर : लोकांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर वाहतुकीबाबत वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. मात्र असे असले तरी आजही वाहनचालकांच्या चुकांमुळे यात्रेकरूंची सुरक्षा धोक्यात आली आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात चक्क एका वाहनचालकानं आपल्या मस्करीमुळे दोन जणांचा जीव धोक्यात घातला.

केरळमध्ये एका बस ड्रायव्हरनं आपल्या मस्करीच्या नादात दोन मुलींचा जीव धोक्यात घातला आहे. यामुळे आता या चालकांचे वाहन परवाना रद्द करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, या बस चालकानं गाडी चालवत असताना गिअर टाकण्यासाठी दोन लहान मुलींना सांगितले, त्यामुळं आरटीओच्या वतीनं या बस चालकावर कारवाई करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये हा बस चालक हसत हसत त्यांना गिअर बदलताना दिसत आहे.

वाचा-धोनीच्या पत्नीसमोर स्टार अभिनेत्री फेल, HOT फोटोंमुळे सोशल मीडियावर धिंगाणा

या व्हिडीओमध्ये ही बस काही कॉलेजच्या मुलांना केरळ-गोवा अशा पिकनीकसाठी घेऊन जाणारी होती. दरम्यान वायनाडमधील एका न्यूज चॅनलनं या व्हिडीओचा खुलासा केला. त्यानंतर हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Loading...

वाचा-लग्नाआधीच 2 मुलींची आई आहे ही अभिनेत्री, 15 वर्षांनी लहान मॉडेलला करतेय डेट

अर्ध्या मिनीटाच्या या व्हिडीओमध्ये दोन मुली ड्रायव्हरच्या बाजूला बसून गिअर बदलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरटीओनं वाहन चालकावर कारवाई केली आहे. बस चालकाचा वाहन परवाना 6 महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे.

वाचा-SBI च्या ग्राहकांना ATM सेंटरमध्ये जाण्याची नाही गरज, इथून काढू शकता पैसे

हा वाहन चालक वायनाडमध्ये राहणारा असून त्याचे नाव शाजी आहे. या घटनेची माहिती आरटीओला मिळाल्यानंतर त्यांनी त्याची चौकशी करण्यात आली. सध्या भारतात वाहन परवाना मिळवण्याच वय 18 वर्ष आहे. दरम्यान वाहन परवानाशिवाय गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2019 08:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com