मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मानलं राव! इंटरव्ह्यू द्यायला आली अन् बॉसवरच झाली फिदा, वाचा अनोखी लव्हस्टोरी

मानलं राव! इंटरव्ह्यू द्यायला आली अन् बॉसवरच झाली फिदा, वाचा अनोखी लव्हस्टोरी

मानलं राव! इंटरव्ह्यू द्यायला आली अन् बॉसवरच झाली फिदा, वाचा अनोखी लव्हस्टोरी

मानलं राव! इंटरव्ह्यू द्यायला आली अन् बॉसवरच झाली फिदा, वाचा अनोखी लव्हस्टोरी

उच्च शिक्षण व नोकरीसाठी केनियातून ऑस्ट्रेलियात आलेल्या सुसॅननं कंपनीतल्या बॉसशीच लग्न केलं; मात्र हे लग्न अनोखं होतं. कारण फिल याला एक आजार असून तो स्वतःच्या पायांवर उभा राहू शकत नाही.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 डिसेंबर: लग्नाचं नातं जोडताना रंग-रूप, पैसा, व्यवहार यांच्यापेक्षा दोन व्यक्तींचं एकमेकांशी पटणं जास्त महत्त्वाचं असतं. तसं असेल, तर जगाची पर्वा न करता दाम्पत्य कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकतं. विचार जुळले, की बाह्य रूप पाहण्याची आवश्यकता वाटत नाही. तसंच काहीसं सुसॅन एलिंग आणि फिल यांच्याबाबतीत घडलं. उच्च शिक्षण व नोकरीसाठी केनियातून ऑस्ट्रेलियात आलेल्या सुसॅननं कंपनीतल्या बॉसशीच लग्न केलं; मात्र हे लग्न अनोखं होतं. कारण फिल याला एक आजार असून तो स्वतःच्या पायांवर उभा राहू शकत नाही.

सुसॅन एलिंग 29 वर्षांची असून, ऑस्ट्रेलियात अ‍ॅडलेड शहरात राहते. तिच्या लग्नाबाबत ती सांगते, “मी उच्च शिक्षणासाठी 2015मध्ये इथे आले. त्यानंतर नोकरीसाठी दिव्यांग व्यक्तींच्या एका संस्थेत मी अर्ज केला. तिथे 3 जणांनी माझी मुलाखत घेतली. त्या वेळी मला वीकेंडच्या आधी पुन्हा संपर्क साधण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर रविवारी मी ई-मेल्स पाहिले, तर त्यात एक ई-मेल होता.” त्या ईमेलमध्ये लिहिलं होतं, की ‘माझा ई-मेल तुम्हाला मिळाला असेल. माझं नाव फिल. मुलाखतीवेळी मी व्हीलचेअरवर बसलो होतो. आपलं काही नातं आहे, असं मला त्या वेळी जाणवलं. तुमची हरकत नसेल, तर मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.’

हेही वाचा:  सीमावादावरून कर्नाटकात महाराष्ट्राविरुद्ध आंदोलन करणाऱ्या 'कन्नड रक्षण वेदिके संघटने'चा इतिहास काय? वाचा सविस्तर

मुलाखतीवेळी आपण खूप नर्व्हस होतो. त्यामुळे मुलाखत घेणारी व्यक्ती व्हीलचेअरवर बसली आहे, याकडे लक्ष नसल्याचं सुसॅन सांगते. ती नोकरी तिला मिळाली. त्या दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. काही दिवसांनी ते एका कॉफी डेटवर गेले. त्या वेळी फिलनं स्वतःला असलेल्या मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजाराबद्दल तिला सांगितलं. या आजाराला बेथलेम मायोपॅथी असंही म्हणतात. या भेटीवेळी इतर माणसं त्यांच्याकडे सतत पाहत होती; मात्र आपल्याला त्यामुळे काही फरक पडत नसल्याचं तिचं म्हणणं आहे.

“'असं अनेकदा होतं, काही काळजी करू नको,' असं फिल यांनी मला सांगितलं. तोपर्यंत फिल यांचं लग्न झालेलं नव्हतं, याचं मला वाईट वाटलं. लोक मला त्यांची केअरटेकर समजत होते, याचंही वाईट वाटलं,” असं सुसॅन म्हणाली. फिल आनंदी व्यक्ती असून त्यांचं काळजी घेणं आणि दयाळूपणा आपल्याला आवडल्याचं ती सांगते. “हळूहळू आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलो. त्यांच्या कुटुंबीयांशीही माझी ओळख झाली; मात्र लोकांच्या नजरा मला त्रास देत होत्या; मात्र आपण कायम सोबत असल्याचं फिल यांनी मला सांगितलं,” असं सुसॅन फिलबद्दल सांगते.

एके दिवशी फिलच्या कुटुंबीयांसोबत असताना त्यानं सुसॅनला लग्नाबाबत विचारलं. तिच्या स्वाहिली भाषेतून त्यानं 'माझं तुझ्यावर प्रेम आहे,' असं सांगून सुसॅनला प्रपोझ केलं. सुसॅनने याबाबत झूम कॉलवरून तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. दोन्ही कुटुंबीयांनी त्यांच्या नात्याला पाठिंबा दिला; मात्र काही जणांनी याला विरोध केला. या नात्यामुळे काही जण आपल्यापासून दूर गेले, असं तिने सांगितलं.

जानेवारी 2018मध्ये एका बागेमध्ये सुसॅन आणि फिल यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ ‘सूजी एलिंग-ऑस्ट्रेलिया’ आणि ‘फिलगुड प्रोडक्शन्स’ या यू-ट्यूब चॅनेल्सवर आहे. त्याव्यतिरिक्त त्यांच्या दैनंदिन आयुष्यातलेही काही व्हिडिओ तिथे शेअर केले जातात. नातं जुळायला मनाच्या तारा जुळणं गरजेचं असतं, तिथं इतर गोष्टी महत्त्वाच्या नसतात, हे सुसॅन आणि फिल यांच्या नात्यावरून लक्षात येतं.

First published:

Tags: Love, Love story