Home /News /viral /

Superhero Dog! चक्क छोट्याशा श्वानाने चक्रीवादळाला थोपवलं; नैसर्गिक आपत्तीपासून शहराला कसं वाचवलं पाहा VIDEO

Superhero Dog! चक्क छोट्याशा श्वानाने चक्रीवादळाला थोपवलं; नैसर्गिक आपत्तीपासून शहराला कसं वाचवलं पाहा VIDEO

चक्रीवादळ दिसताच एका कुत्र्याच्या पिल्लाने थेट त्याच्यात उडी मारली आणि नैसर्गिक संकटही थोपवून एका शहरावर येणारं संकट परतवून लावलं आहे.

    मुंबई, 27 जून : भूकंप, पूर, त्सुनामी, चक्रीवादळ अशा नैसर्गिक संकटांना कुणीच रोखू शकत नाही. तंत्रज्ञानाच्या युगात राहणाऱ्या माणसालाही ते शक्य झालं नाही. पण एका श्वानाने ते करून दाखवलं (Dog video viral). चक्क एका नैसर्गिक आपत्तीला त्याने थोपवलं आहे. छोट्याशा मुक्याजीवाने चक्रीवादळाला थोपवून एका शहराला नैसर्गिक संकटापासून वाचवलं आहे. हा सुपरहिरो डॉगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे (Suprehero dog destroy tornado). चक्रीवादळ येत असल्याचं समजताच त्याचा वेग, तीव्रता आणि त्याची दिशा समजून घेऊन आवश्यक ती पावलं उचलून बचावासाठी प्रयत्न करणं इतकंच माणसांच्या हातात असतं. थेट चक्रीवादळाशी दोन हात कुणीच करू शकत नाही. पण एका कुत्र्याच्या पिल्लाने ते केलं. त्यामुळे हा डॉग कोणत्या सुपरहिरोपेक्षा कमी नाही. श्वान माणसांना कोणत्याही संकटापासून वाचवू शकतो, हेच या व्हिडीओतून दिसून येतं आहे. हे वाचा - OMG! हवेत उडत थेट झाडावर लँड झाली कार; अंगावर काटा आणणारा Video व्हिडीओत पाहू शकता एक चक्रीवादळ तयार होताना दिसतं आहे. तिथंच काही लहान मुलंही दिसत आहे. चक्रीवादळाला पाहताच एक छोटंसं श्वान तिथं येतं आणि ते त्या चक्रीवादळात उडी मारतं. पण त्यानंतर ते चक्रीवादळ जमिनीवर दुसरीकडे सरकतं. कुत्र्याचं पिल्लू पुन्हा तिथं जातं आणि त्यात उडी मारतं. जिथं जिथं चक्रीवादळ जातं तिथं तिथं हे पिल्लू जातं. पण हार मानत नाही. चक्रीवादळ थोपवूनच ते शांत राहतं. हे एक छोटंसं चक्रीवादळ आहे. अशी वादळं येत असतात, ज्यात नुकसान होत नाही. पण तरी हे नेमकं काय आहे हे श्वानाला माहिती नाही. ते खेळण्यासाठी म्हणून त्याच्यात उडी मारतं. त्याला काहीच होत नाही म्हणून वारंवार ते त्यामध्ये जातं. पण जर हे चक्रीवादळ मोठं असतं. तर श्वानाला आपल्या विळख्यात घेतलं असतं. हे वाचा - Viral Video : गर्लफ्रेंडला डोंगरावरुन ढकललं, उंचावरुन पडतानाही प्रियकराला ओरडून म्हणाली... व्हिडीओ तसा मजेशीर आहे पण श्वानाच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे. या श्वानाला सुपरहिरो म्हटलं आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट करताना सुपरहिरोने चक्रीवादळाला थोपवलं आणि शहर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं. असं कॅप्शन दिलं आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नेमकं काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Dog, Pet animal, Viral, Viral videos

    पुढील बातम्या