मराठी बातम्या /बातम्या /Viral /Viral Video : मुलीच्या हट्टामुळे गायलं गाणं अन् थेट मिळाली सोनू सूदकडून ऑफर!

Viral Video : मुलीच्या हट्टामुळे गायलं गाणं अन् थेट मिळाली सोनू सूदकडून ऑफर!

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियामुळे देशातल्या कानाकोपऱ्यात असलेलं टॅलेंट जगाच्या समोर येत आहे. आपली आवड जोपासत अनेक जण दर दिवशी असंख्य व्हिडिओ शेअर करत असतात.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली, 28 जानेवारी : सोशल मीडियामुळे देशातल्या कानाकोपऱ्यात असलेलं टॅलेंट जगाच्या समोर येत आहे. आपली आवड जोपासत अनेक जण दर दिवशी असंख्य व्हिडिओ शेअर करत असतात. त्यातले काही निवडक व्हिडिओ नेटिझन्सच्या पसंतीला उतरतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुलीने आग्रह केल्यानंतर एक आई चपात्या बनवताना बॉलिवूडचं लोकप्रिय गीत गात असल्याचं यात दिसतं. त्यातल्या आईचा आवाज अनेकांच्या पसंतीला उतरला असून अभिनेता सोनू सूदनेही गीत गाणाऱ्या महिलेचं भरपूर कौतुक केलं आहे. शिवाय आपल्या चित्रपटात गीत गाण्यासाठी त्या महिलेला ऑफरही दिली. ‘झी न्यूज हिंदी’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

  कोरोना काळात परराज्यातल्या मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूदनं मदतीचा हात पुढे केला होता. याबद्दल आजही त्याचं नाव घेतलं जातं. सोनू सूद नेहमी सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. गरजूंना मदत करण्याच्या दृष्टीने सोशल मीडियावर तो नेहमी पुढाकार घेताना दिसतो. गाणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा सोनूने त्या महिलेस मदत करण्याची तयारी दाखवली. त्या महिलेला आपल्या चित्रपटात काम देण्याची इच्छा त्यानं ट्विटरवर व्यक्त केलीय.

  हेही वाचा -  सरकारी नोकरी करणारी मुलगी हवी! हुंडा मी देणार, तरुणाचा हटके VIDEO पाहून म्हणाल....

  गीत गाणाऱ्या आईचा मुलीनेच बनवला व्हिडिओ

  स्वयंपाक घरात चपत्या बनवताना गीत गाणाऱ्या महिलेचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला. यात त्या महिलेची मुलगी तिला गीत गाण्यासाठी आग्रह करताना दिसते. मुलीनं खूपच हट्ट धरल्यानंतर आई गीत गात असल्याचं यात दिसून येतं. आईचा सुमधुर आवाज ती मुलगीच मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करते. ती महिला किशोर कुमार यांचं ‘मेरे नैना सावन भादो…’ हे सुपरहिट गीत म्हणत आहे. कुठल्याही वाद्याचा आधार न घेता स्वयंपाकघरामध्ये महिला ज्या पद्धतीने गीत गात आहे ते ऐकून अनेक जणांना यावर विश्वासही बसत नाहीये. याच व्हिडिओवर सोनू सूदनं प्रतिक्रिया दिली.

  View this post on Instagram

  A post shared by news18lokmat (@news18lokmat)

  सोनू म्हणतो की, ‘तुम्ही मला तत्काळ मोबाइल नंबर पाठवा, माझ्या पुढील चित्रपटासाठी तुम्ही गीत गाणार आहात.’ महिलेला सोनू सूदने गाण्याची ऑफर दिल्यामुळे त्याचं भरपूर कौतुक केलं जात आहे.

  सोनू सूदला ठरवलं सुपरहिरो

  अभिनेता सोनू सूदने महिलेला काम देण्याची तयारी ट्विटरवर दाखवताच नेटिझन्सनी कमेंट करून सोनूचं भरपूर कौतुक केलं आहे. तो भारताचा सुपरहिरो आहे असं एका युझरने म्हटलं आहे. अनेक जणांनी ‘तू आमची प्रेरणा आहेस…’ असं मत मांडलं आहे. महिलेचा व्हिडिओ ट्विटरवर साडेतीन हजार जणांनी रिट्विट केला असून 32 हजारांपेक्षा अधिक लाइक्स या व्हिडिओला मिळाले आहेत.

  First published:

  Tags: Social media viral, Top trending, Video viral, Viral, Viral news