मराठी बातम्या /बातम्या /Viral /अचानक गाडीतून निघाला किंग कोब्रा, चालकाने जीव मुठीत ठेवून केलं असं काही....

अचानक गाडीतून निघाला किंग कोब्रा, चालकाने जीव मुठीत ठेवून केलं असं काही....

व्हायरल

व्हायरल

साप हा अत्यंत धोकादायक प्राणी आहे. साप कुठे लपून बसेल आणि कधी कुठे निघेल याचा काही नेम नाही. त्यामुळे अडगळीच्या जागी साप निघण्याचे प्रकार वाढत असल्याचं पहायला मिळत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 2 एप्रिल : साप हा अत्यंत धोकादायक प्राणी आहे. साप कुठे लपून बसेल आणि कधी कुठे निघेल याचा काही नेम नाही. त्यामुळे अडगळीच्या जागी साप निघण्याचे प्रकार वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. आजकाल कुठेही साप निघत असून याचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अशातच आणखी एका ठिकाणी साप निघाल्याचा प्रकार समोर आला आहे.

सध्या समोर आलेल्या घटनेत एका दुचाकीमधून किंग कोब्रा निघाला. धक्कादायक बाब म्हणजे, व्यक्ती जेव्हा गाडीवर चालला होता तेव्हाच तो फना काढत वर आला. साप पकडणाऱ्याने काठीच्या सहाय्याने किंग कोब्राला गाडीवरुन काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो जागचा काही हलला नाही. नंतर साप पकडणाऱ्याने त्याला ताब्यात घेतलं. ही घटना बुंदेलखंडमधील सागर जिल्ह्यातून समोर आली आहे.

हेही वाचा -  Video : अपघात कसा झाला? टेम्पो पलटी झाल्यावर ड्रायव्हरनेच लावला डोक्याला हात

ही घटना बुंदेलखंडच्या सागर जिल्ह्यातून उघडकीस आली आहे, जिथे एक व्यक्ती शांतपणे आपली बाईक चालवत होती, तेव्हा अचानक त्याला वाहनातून मोठा आवाज ऐकू आला. आवाज ऐकून दुचाकीवर बसलेला व्यक्ती घाबरला आणि त्याने लगेचच आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली आणि तेवढ्यात गाडीतून किंग कोब्रा फना काढून बाहेर आला. हृदय पिळवटणारी ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

दरम्यान, कधी बॅगमधून, कधी शूजमधून, गाडीमधून, साप निघणे अशा घटनेमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भिती बसली आहे. अशा धक्कादायक घटनांचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पहायला मिळतात.

First published:
top videos

    Tags: King cobra, Viral, Viral news