Home /News /viral /

VIDEO - पहिल्या पावलात आलेला मृत्यू दुसऱ्या पावलात परतला; अवघ्या एका सेकंदाने व्यक्तीने दिला मृत्यूला चकवा

VIDEO - पहिल्या पावलात आलेला मृत्यू दुसऱ्या पावलात परतला; अवघ्या एका सेकंदाने व्यक्तीने दिला मृत्यूला चकवा

व्यक्तीसोबत भयंकर दुर्घटना घडली पण मृत्यू तिला स्पर्शही करू शकली नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    मुंबई, 05 ऑगस्ट : मृत्यू कधी कुठे कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण काही लोकांचं नशीब म्हणा किंवा चमत्कार ते मृत्यूलाही चकवा देतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका व्यक्तीने एका सेकंदात मृत्यूला चकवा दिला आहे. एक पाऊल टाकताच मृत्यू त्याच्या जवळ आला पण दुसरं पाऊल टाकताच मृत्यू परतला. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. एक व्यक्ती मृत्यूच्या दारातून कसा परत आला याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. मृत्यूच्या दारात जाऊनही मृत्यू या व्यक्तीला स्पर्श करू शकला नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओ पाहूनही तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती एका दुकानाच्या दिशेने येते. आपल्या मार्गात मृत्यू आहे, याची पुसरटशीही कल्पना त्याला नाही. कारण समोर तसा कोणताच धोका दिसत नाही. जशी ही व्यक्ती दुकानाजवळ पोहोचते, दुकानाबाहेर असलेल्या फूटपाथवर जशी ती पाय ठेवते तशी ती जमीन अचानक धसते. पुढच्याच क्षणी ही व्यक्ती त्या जमिनीवरील पाऊल पुढे टाकते. हे वाचा - Oh no! ट्रकला वाचवता वाचवता हवेत उडत पाण्यात कोसळली क्रेन; थरकाप उडवणारा VIDEO VIRAL जमिनीचा जो भाग धसला आणि तिथं मोठा खड्डा झाला. त्या भागावरून एक पाऊल ही व्यक्ती पुढे असते. एका पावलात, एका सेकंदात या व्यक्तीचा जीव वाचला आहे. मागे पाहताच ही व्यक्तीसुद्धा हैराण होते. थोडा वेळ ती सुन्नच होते. नेमकं काय झालं हे तिलाही समजत नाही आणि नंतर आपण किती मोठ्या दुर्घटनेतून बचावलो हे पाहूनच त्याला आश्चर्य वाटतं. जेव्हा घटना घडते तेव्हा दुकानात असलेले काही लोकही तिथं धावत येतात. तेसुद्धा हे पाहून हैराण होतात. हे वाचा - VIDEO - लग्नासाठी घेतली मोठी रिस्क! उतावळ्या नवरदेवाची वऱ्हाड्यांसह पुराच्या पाण्यात उडी ही घटना कुठली आणि कधीची आहे माहिती नाही. पण रेडिट सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. बस्स एक आणखी सामान्य दिवस असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. एक सेकंदही उशीर झाला असता तर कदाचित या व्यक्तीचा जीवही गेला असता. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहे. या व्यक्तीला बहुतेकांनी नशीबवान म्हटलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Accident, Shocking video viral, Viral, Viral videos

    पुढील बातम्या