मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मोबाइलचा असाही धोका; भररस्त्यात चालत जात असताना अचानक गायब झाला तरुण, पाहा VIDEO

मोबाइलचा असाही धोका; भररस्त्यात चालत जात असताना अचानक गायब झाला तरुण, पाहा VIDEO

मोबाइलचं व्यसन अनेकदा जीवघेणं ठरू शकतं, हे आपण वारंवार विविध घटनांमधून पाहत आहोत.

मोबाइलचं व्यसन अनेकदा जीवघेणं ठरू शकतं, हे आपण वारंवार विविध घटनांमधून पाहत आहोत.

मोबाइलचं व्यसन अनेकदा जीवघेणं ठरू शकतं, हे आपण वारंवार विविध घटनांमधून पाहत आहोत.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 14 मे :  सध्याच्या काळात लोक मोबाइलमध्ये इतके व्यग्र झाले आहेत की, घर, ऑफिस, रस्त्यासह अनेक ठिकाणी ते मोबाइलमध्ये डोकं घालून चालताना दिसतात. प्रत्येक वेळी मोबाइलमध्ये पाहत राहणं ही वाईट सवय आहे. यामुळे आपण स्वत:ला तर वेळ देऊ शकत नाही, याशिवाय कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींनाही वेळ देऊ शकत नाहीत. मोबाइलच्या व्यसनापायी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्या जीवघेण्या ठरल्या आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कशा प्रकारे व्यक्ती मोबाइलमधून व्हिडिओ तयार करण्याच्या नादात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडले. हे अत्यंत धोकादायक आहे. जर खड्डा जास्त खोल असता तर त्या व्यक्तीचा जीव जाऊ शकला असता. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कसं वागू नये याचा चांगलाच धडा इतरांना मिळाला असेल अशी आशा आहे. मोबाइलचा वापर कधी, व कसा करायचा याबाबत आपणचं आपले नियम पाळायला हवेत.

हे ही वाचा-पार्कमध्ये घडला बॉडी शेमिंगचा प्रकार, 'too short' म्हणत पोलिसांनी काढलं बाहेर

मोबाइल हातात घेत त्याचा काहीतरी करीत चालत असलेल्या व्यक्तीला पुढे पाण्याने भरलेला खड्डा असल्याचं माहित नव्हतं. सुदैवाने यामध्ये व्यक्तीला काही त्रास सहन करावा लागला नाही. मात्र आयुष्यभरासाठी हा प्रसंग त्याच्या कायम लक्षात राहील. हा प्रसंग ज्या व्यक्तीसोबत घडला ती व्यक्ती मात्र हा प्रसंग काय लक्षात ठेवेल, आणि भविष्यात असं वागणार नाही.

First published:

Tags: Mobile, Viral video.