मराठी बातम्या /बातम्या /Viral /

स्टंटबाजीचा VIDEO नंतर 'आना ही पडा सजना' आणि मग 4 हजार 200 चा झटका...

स्टंटबाजीचा VIDEO नंतर 'आना ही पडा सजना' आणि मग 4 हजार 200 चा झटका...

स्टंटबाजी करताना तरुण

स्टंटबाजी करताना तरुण

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो एका स्टंटचा आहे. ज्यामध्ये एक तरुण बाईक चालवत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 26 सप्टेंबर : सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जेथे तुम्ही व्हिडीओ पाहून स्वत:चं मनोरंजन करु शकता किंवा स्वत:चे व्हिडीओ देखील शेअर करु शकता. अनेकांना येथे प्रसिद्धी देखील मिळाली आहे. तर काही तरुण असे देखील आहेत, जे प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात, ज्यासाठी ते आपल्या जिवाची देखील पर्वा करत नाहीत.

म्हणूनच तर बऱ्याचदा आपण सोशल मीडिया ओपन केला तरी देखील आपल्यासमोर असे अनेक स्टंटचे व्हिडीओ येतात. हे स्टंट खूपच धोकादायक असता, कारण यामुळे त्या स्टंट करणाऱ्या आणि इतर लोकांना देखील धोका असतो.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो एका स्टंटचा आहे. ज्यामध्ये एक तरुण बाईक चालवत आहे. परंतू तो सर्वांसारखा बाईक न चालवता बाईकच्या एका बाजूला दोन्ही पाय टाकून बसला आहे आणि रस्त्यावर आपली बाईक पळवत आहे.

हे वाचा : महिलेच्या घरातील भिंतीतून बाहेर पडू लागलं रक्त, प्लंबरला बोलावताच समोर आलं धक्कादायक रहस्य

या तरुणाचा हा स्टंट फारच धोकादायक आहे, कारण यामुळे या तरुणाचा तोल जाऊ शकतो किंवा तो समोरील वाहानाला धडकू शकतो, त्याच्या या अशा स्टंटबाजीमुळे इतरांच्या जीवाला देखील धोका आहे, परंतू तो याचा विचारच करत नाही.

पण म्हणतात ना, तुम्ही काहीही केलंत तरी त्याची शिक्षा तुम्हाला याच जन्मात भोगावी लागते? तसंच या तरुणासोबत घडलं, व्हिडीओ पूर्ण पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, या तरुणाने केलेल्या स्टंटचा त्याला चांगलाच मोबदला द्यावा लागला आहे.

हे वाचा : धुक्यांमुळे त्यानं गाडीचा वेग कमी केला, पण मागून भरधाव कार आली आणि थेट गाडी हवेत उडाली, VIDEO VIRAL

स्टंटचा व्हिडीओ व्हायरल होताच,, पोलिसांनी या तरुणावर कारवाई केली आणि त्या 4 हजार 200 रुपयांचा दंड भरावा लागला. इतकंच नाही तर कान पकडून माफी मागताना देखील तुम्ही या तरुणाला पाहू शकता.

हे प्रकरण मध्यप्रदेशातील दुर्ग जिल्हायातील आहे अशी माहिती मिळाली आहे. खरंतर दुर्ग पोलीस आता अशा स्टंटबाजी करणाऱ्या लोकांना चांगलीच अद्दल घडवत आहेत आणि त्यांच्याकडून दंड देखील स्वीकारत आहेत.

या तरुणाच्या या संपूर्ण परिस्थितीचा व्हिडीओ देखील या दुर्ग पोलिसांना आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केली, ज्यावर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, स्टंट, मॉडिफाइड सायलेन्सर, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर दुर्ग पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. तसेच त्यांनी हेल्पलाईन नंबर देखील शेअर केला आहे, ज्यावर अशा लोकांची तुम्ही तक्रार करु शकता.

First published:

Tags: Shocking viral video, Stunt video, Top trending, Viral news