मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रामदेव बाबांची नक्कल करणं तरुणाला पडलं महागात, Video असा की पाहून थांबणार नाही हसू

रामदेव बाबांची नक्कल करणं तरुणाला पडलं महागात, Video असा की पाहून थांबणार नाही हसू

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला त्या व्यक्तीची अवस्था पाहून हसू येईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 29 नोव्हेंबर : सोशल मीडियावर नेहमीच असे काही विचित्र व्हिडीओ समोर येत असतात की आपल्यालाच कधीकधी आश्चर्य वाटतं. तर काही व्हिडीओ पाहून आपलं पोट दुखेपर्यंत हसू येईल असे असतात. काही लोक इतके अतरंगी असतात की त्यांना काही ना काही विचित्र प्रयत्न करायचे असतात. मग ते त्यासाठी आपल्या स्वत:च्या जीवाची पर्वा देखील करत नाहीत.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला त्या व्यक्तीची अवस्था पाहून हसू येईल.

खरंतर कोणताही व्यायामाचा प्रकार किंवा योगा करायच म्हटलं की त्यासाठी खूप सारी मेहेनत, संयम आणि सरावाची गरज असते. पण जर तुम्ही डायरेक्ट विचार कराल की हे बघायला भारी वाटतंय आणि मी तसं करेन, तर ते शक्य होत नाही आणि असंच काहीसं या व्हिडीओमधील व्यक्तीने करण्याचा प्रयत्न केला.

हे ही पाहा : समुद्रात गर्लफ्रेंडला प्रपोज करायला गेला खरा पण, त्यानंतर जे घडलं ते... पाहा Video

या व्हिडीओमधील ही व्यक्ती योगगुरू बाबा रामदेव यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्याला या प्रयत्नात यश येत नाही. त्याचबरोबर त्याला गंभीर दुखापत देखील होते.

खरंतर हा व्यक्ती स्टंट करु पाहात होता, त्याचा योगाशी काहीही संबंध नाही. त्यासाठी ती व्यक्ती वीट गोळा करते आणि ती एकावर एक उभी करते. या विटांची उंची सुमारे 3 फूट असेल. यानंतर ती व्यक्ती दोन्ही हातांच्या साहाय्याने उलटी होते आणि विटेवर डोकं ठेवण्याचा प्रयत्न करते.

काही क्षणांसाठी या व्यक्तीचा स्टंट यशस्वी होणार असं वाटत असतं, पण तसं न होता पुढच्याच क्षणी या व्यक्तीचा तोल जातो आणि तो खाली पडतो. तो नुसता पडत नाही तर त्याला गंभीर दुखापत देखील होते. तो ज्या पद्धतीने पडतो, त्यावरुन तर त्याच्या पाठीला लागलं असल्याचे लक्षात येत आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखम होते.

अशी काही काम नेहमीच तज्ज्ञाच्या देखरेखीखालीच करावे, असे वडीलधारे नेहमीच सांगतात आणि आपण त्यांचे ऐकले देखील पाहिजे.

हा व्हिडीओ 'एपिक फेल'ने ट्विटरवरील आपल्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले - चेहरा फोडला. हा व्हिडीओ पाहून लोकांनी सावधगीरी बाळगावी आणि अशा स्टंटला बळी पडू नये असे सल्ले देखील नेटकऱ्यांकडून दिले जात आहेत.

First published:

Tags: Social media, Top trending, Videos viral, Viral