नवी दिल्ली 28 मे : मैत्री हे असं नातं आहे जे रक्ताचं नसलं तरीही अगदी जवळचं आणि खास वाटतं. लोक मित्रांसाठी जीवही देऊ शकतात. आपल्या मदतीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारे खास मित्र भाग्यवानांनाच मिळतात. अलीकडेच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओने याचाच प्रत्यय दिला की वय काहीही असो, मित्रांमधील प्रेम तसंच राहातं.
VIDEO : स्टंटसाठी तरुणाने मुंबईतल्या गगनचुंबी इमारतीवरून मारली उडी; धक्कादायक शेवट
ग्रीन बेल्ट आणि रोड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष @ErikSolheim यांनी अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ केवळ हैराण करणाराच नाही तर भावनिकही आहे. कारण या व्हिडिओमध्ये लहान मुलांमधील प्रेम दिसतं. यात काही मुलं आपल्या एका अपंग मित्राला निस्वार्थपणे मदत करतात, तेही स्वतःचा जीव धोक्यात घालून (Students Save Life of Handicapped Friend During Earthquake).
Solidarity!
On May 20th, in the middle school of Sichuan 🇨🇳 earthquake with magnitude 4.8, teachers and classmates didn't forget him in wheelchair. 👍👍👍 pic.twitter.com/FRzMTM7Z0Q — Erik Solheim (@ErikSolheim) May 25, 2022
व्हिडिओच्या कॅप्शननुसार, 20 मे रोजी चीनच्या सिचुआनमध्ये 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यामुळे एक शाळाही हादरली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाबाहेर धावताना दिसत आहेत. मात्र यादरम्यान त्यांनी असं काम केलं की सगळेच त्यांची प्रशंसा करू लागले. या मुलांसोबत त्यांचा एक वर्गमित्रही आहे, जो व्हीलचेअरवर बसलेला दिसतो. इतर मुलं पळू लागली तेव्हा काहींनी त्या विद्यार्थ्याकडेही लक्ष दिलं. त्यांनी आपला जीव वाचवण्याऐवजी आधी त्या विद्यार्थ्याला वाचवण्याचा विचार केला. त्यांनी व्हिलचेअरच्या मदतीने त्याला क्लासरूममधून बाहेर काढलं आणि आपल्यासोबत शाळेबाहेरील रिकाम्या जागेत नेलं.
बापरे! सोफ्यावर बसल्या बसल्या अचानक हवेत उडाला तरुण; नेमकं काय घडलं पाहा VIDEO
या व्हिडिओला 35 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी रिट्विट करून प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकाने लिहिलं की वर्गमित्र आणि मित्रांमध्ये फरक आहे. हा फरक या व्हिडिओमध्ये दिसत आहे, ते सर्व मित्र आहेत. एका व्यक्तीने सांगितलं की, व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं की, या संपूर्ण प्रक्रियेचा मुलांना खूप अनुभव आहे. तर एकाने हा मानवतेचा खरा चेहरा असल्याचं म्हटलं. याशिवाय अनेकांनी या मुलांचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.