मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पोरं ती पोरं आता पोरीही! धावत्या रेल्वेत विद्यार्थ्यांचा खतरनाक Train stunt video

पोरं ती पोरं आता पोरीही! धावत्या रेल्वेत विद्यार्थ्यांचा खतरनाक Train stunt video

गणवेशामध्ये धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

गणवेशामध्ये धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

गणवेशामध्ये धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad

चेन्नई, 25 नोव्हेंबर : हल्लीची तरुणाई स्टाईल दाखवण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालत असते. ट्रेन स्टंटचे व्हिडीओ (Train stunt video) तसे आपल्यासाठी नवीन नाहीत. किती तरी तरुणांना रेल्वेत जीवघेणे स्टंट करताना तुम्ही पाहिलं असेल. मुलांसोबत मुलींनाही (Girl train stunt video) स्वतःच्या जीवाची काहीच पडलेली नाही का? असाच प्रश्न विचारायला भाग पाडणारा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. पोरांप्रमाणे पोरगीही खरतनाक स्टंट करताना दिसली (Chennai students train stunt video).

रेल्वेत जीवघेणे स्टंट करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालत्या ट्रेनमध्ये चढू नका किंवा उतरू नका अशा सूचना वारंवार दिल्या जातात. पण मजा म्हणून तरुण तेच करताना दिसतात. मुलं तर या सराईत होतीच पण आता मुलीही आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत.  चेन्नईच्या (Chennai railway station stunt video) कवारपेट्टई रेल्वे स्टेशनवरील (Kavarapettai railway station) हे धक्कादायक दृश्य आहे.

शाळेचा गणवेश घातलेली एक मुलगी आणि मुलगा प्लॅटफॉर्मवर धावताना दिसत आहेत. मुलगी पुढे धावते आहेत. धावत धावतच ती चालत्या ट्रेनमध्ये चढते. ट्रेनमध्ये चढताच दरवाजाला धरून खाली बसते आणि आपला एक पाय प्लॅटफॉर्मवर सोडते. एरवी जसं तरुणांना आपण असं करताना पाहतो, तेच ही मुलगीही करताना दिसते. त्यानंतर तिच्यामागील मुलगाही तसंच करतो. प्लॅटफॉर्म संपल्यावर दोघंही ट्रेनच्या आत जातात.

हे वाचा - दुर्दैवी! बापाच्या कारखाली चिरडून लेकाचा अंत; हृदय पिळवटून टाकणारा Live video

त्यांच्या एकंदर वागणुकीवरून त्यांची ट्रेन सुटली म्हणून ती पकडण्यासाठी धावतात इतकंच नाही. खरंतर या दोघांनी स्टंटचीच स्पर्धा लावली हे हे व्हिडीओ पाहून समजतं. Raghu VP ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. नेटिझन्सनी यावर बऱ्याच कमेंट केल्या आहेत. असं जीवाशी खेळू नका, असंच आवाहन अनेकांनी केलं आहे.

हे वाचा - 'ओह ओह जाने जाना...'वर आजोबांचा आपला जलवा; डान्स पाहून शर्टलेस सल्लूलाही विसराल

सध्याच्या जगात महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे. अशी कोणतीच गोष्ट नाही जी पुरुषांना जमते आणि महिलांना नाही. स्त्री-पुरुष समानता हवीच, पण कृपया इथं ती नको. आपल्या अमूल्य आयुष्याची अशी वाट लावू नका, इतकंच आवाहन.

First published:

Tags: Chennai, Shocking viral video, Stunt video, Viral, Viral videos