मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आईच्या गावात अन् बाराच्या भावात! शालेय विद्यार्थ्याचं Leave application वाचून पोट धरून हसाल

आईच्या गावात अन् बाराच्या भावात! शालेय विद्यार्थ्याचं Leave application वाचून पोट धरून हसाल

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

एका शालेय विद्यार्थ्याचा सुट्टीचा अर्ज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

भोपाळ, 26 नोव्हेंबर : शाळेत सुट्टी हवी तर एक सुट्टीचा अर्ज द्यायला लागतो हे तुम्हाला माहितीच असेल. हा सुट्टीचा अर्ज लिहिणंही म्हणजेही एक कौशल्यच. अशाच एका शालेय विद्यार्थ्याचा सुट्टीचा अर्ज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो वाचून तुम्हाला बिलकुल हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर या फनी लिव्ह अॅप्लिकेशनचीच चर्चा होते आहे.

एका विद्यार्थ्याला बरं नाही आहे. त्यामुळे त्याने आपल्या शाळेच्या शिक्षकांकडे सुट्टीसाठी एक अर्ज दिला आहे. आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा अर्ज पोस्ट केला आहे.  हा अर्ज वाचल्यानंतर त्याच्या शिक्षकांनीही त्याला तातडीने सुट्टी मंजूर केली असावी. असंच तुम्हीही म्हणाल. असं या विद्यार्थ्याने या अर्जात काय लिहिलं आहे ते पाहुया.

हे वाचा - VIDEO - दिसायला नाजूक, सुंदर, साधीभोळी; पण हिने गोड हसत जे केलं ते पाहून तोंडात घालाल बोटं

बुंदेलखंडी बोलीत खूप मजेशीर असा हा अर्ज आहे.  या सुट्टीच्या अर्जात म्हटलं आहे. आदरणीय मुख्याध्यापक, माध्यमिक पाठशाळा बुंदेलखंड. मास्तर...दोन ते चार दिवस मी शाळेत येणार नाही आहे. मला ताप आला आहे, नाकही वाहत आहे. त्यामुळे मी शाळेत येऊ शकत नाही. तुम्हाला विनंती आहे की मला मला दोन-चार दिवसांची सुट्टी दिली तर बरं होईल. मी नाही आल्याने तुमची शाळा कुठे बंद होणार आहे. तुमचा...आज्ञाधारी विद्यार्थी...कलुआ.

याआधीही अशाच एका विद्यार्थ्याच्या रजेचा अर्ज व्हायरल झाला होता. ज्यात त्याने माझं निधन झालं आहे, मला अर्ध्या दिवसाची सुट्टी हवी, असं म्हटलं होतं. आश्चर्य म्हणजे प्राध्यापकानेही त्याला सुट्टी मंजूर केली होती. आता सुट्टीच्या या अर्जाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

आयएएस ऑफिसर अर्पित वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा अर्ज पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर सुट्टीचा हा अर्ज अनेकांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

हे वाचा - अबब! तरुणाच्या डोक्यावर केसांऐवजी बर्फ; काय आहे हा प्रकार पाहा VIDEO

तुम्हाला हा अर्ज कसा वाटला किंवा हा अर्ज वाचून तुम्हाला काय वाटलं, कशाची आठवण झाली? किंवा तुमच्या, तुमच्या मित्रमैत्रिणींच्या सुट्टीच्या अर्जाचा असा मजेशीर किस्सा असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.

First published:

Tags: Viral, Viral news