मराठी बातम्या /बातम्या /Viral /

शाळेच्या बाथरुममागे विद्यार्थ्याला मिळाला गुप्त रस्ता, आतमध्ये डोकावताच आश्चर्याचा धक्का

शाळेच्या बाथरुममागे विद्यार्थ्याला मिळाला गुप्त रस्ता, आतमध्ये डोकावताच आश्चर्याचा धक्का

शाळेच्या बाथरुममधूनच एक गुप्त (Student found tunnel inside school toilet) रस्ता बाहेर पडत असल्याचा साक्षात्कार एका विद्यार्थ्याला झाला आणि ही बाब बघता बघता व्हायरल झाली.

  • Published by:  desk news

होंड्युरस, 23 नोव्हेंबर: शाळेच्या बाथरुममधूनच एक गुप्त (Student found tunnel inside school toilet) रस्ता बाहेर पडत असल्याचा साक्षात्कार एका विद्यार्थ्याला झाला आणि ही बाब बघता बघता व्हायरल झाली. नेहमीप्रमाणे शाळेत टॉयलेटला गेलेल्या एका विद्यार्थ्याला असं काही दिसलं की त्याचा शोध (Student found tunnel) घेण्याची इछा त्याच्या मनात तयार झाली. वास्तविक, शालेय आयुष्यातील प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी असतात. कुणाला शालेय जीवनातील प्रसंग आठवत असतात, तर कुणाला काही धाडसी घटना. या घटनेतील विद्यार्थ्याला मात्र टॉयलेटपाशी दरवाजापाशी काहीतरी असल्याचा भास झाला आणि त्याने शोध घ्यायला सुरुवात केली.

भिंतीला होता खड्डा

ही घटना आहे होंड्युरसमधील. एका शालेय विद्यार्थ्याचा टिकटॉकवरील व्हिडिओ व्हायरल होत असून त्यला आतापर्यंत 2.5 कोटींपेक्षा अधिक व्हूज मिळाले आहेत. टॉयलेटजवळच्या एका भिंतीपाशी एक खड्डा पडल्याचं त्याला दिसलं. बारकाईनं पाहिल्यावर तिथं एक दरवाजा त्याला दिसला. त्यानं तो दरवाजा उघडला आणि त्याच्या हातात एक चिठ्ठी पडली. त्या चिठ्ठीवर ENTER असं लिहिलं होतं. त्या छोट्याशा दरवाजातून आत जाण्याचा निर्णय विद्यार्थ्याने घेतला.

काय होतं दरवाजात?

वास्तविक, हा एक छोटासा दरवाजा होता. मात्र पहिल्यांदाच तो उघडण्यात आला होता. तो उघडता क्षणी मुलाला एक चिठ्ठीही सापडली होती आणि त्यावर दरवाजातून आत प्रवेश करण्याची सूचना लिहिली होती. आतमध्ये काय आहे, हे पाहण्याच्या औत्सुक्यानं त्यानं त्या दरवाजातून आत वाकून पाहिलं आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. दरवाजाच्या आत वाकून पाहिल्यावर पहिल्यांदा मुलाला काहीच दिसलं नाही. सर्वत्र फक्त अंधाराचं साम्राज्य होतं. मात्र काही वेळानं नजर स्थिर झाल्यावर त्यानं आजूबाजूला पाहिलं. त्यावेळी दरवाजाच्या आतमध्ये एक बोगदा असल्याचं त्याला दिसलं. ते पाहून तो बाहेर आला आणि ही गोष्ट सर्वांना सांगितली.

हे वाचा - संतापजनक! पत्नी रुसल्याचा आला राग, काठीने मारून केला खून

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगत आहे. पूर्वी हा तुरुंग असावा, त्यामुळेच एखाद्या कैद्यानं पळून जाण्यासाठी बोगदा खणला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. तर एकाने शाळा हादेखील एक प्रकारचा तुरुंगच असल्यामुळं विद्यार्थ्यांना पळून जाण्यासाठी हा बोगदा असावा, अशी गंमतीशीर कमेंटही एका युजरनं केली आहे.

First published:

Tags: School student, Student