Home /News /viral /

Video : ...म्हणून आई-बाबांचं ऐकायचं असतं, पाहा Power Of Government Job

Video : ...म्हणून आई-बाबांचं ऐकायचं असतं, पाहा Power Of Government Job

हा Video सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : Power Of Government Job: सरकारी नोकरीचं क्रेज आपल्या देशात अनेकदा पाहायाला मिळतं. अनेकदा करिअरची निवड करतानाही आई-बाबा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला देतात. सरकारी नोकरी सुरक्षित असते. सर्वांनाच सरकारी नोकरी मिळू शकत नाही, हे खरं असलं तरी दरवर्षी लाखो लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले जातात. चेहरा पाहून तरुणीने दिला होता नकार... दुसरीकडे प्रत्येक आई-वडील आपल्या मुलीसाठी सरकारी नोकरी असलेल्या तरुणाची निवड करतात. याच्याशी संबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. व्हिडीओमध्ये एक तरुणी सांगते की, सुरुवातील पतीचा चेहरा पाहून रिजेक्ट केलं होतं. त्यानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळाली. आणि घरातील सर्वांनीच त्याच्यासोबत लग्न करण्याची परवानगी दिली. हे ही वाचा-माझ्यावर प्रेम कर, नाहीतर नोकरी सोड'; महिलेनं बॉडीगार्डसमोर ठेवली अट अन्... सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खूप मजेशीर आहे. व्हिडीओमध्ये पत्नी आपल्या पतीसोबत दिसत आहे. पत्नी म्हणते की, सुरुवातील मी यांचा चेहरा पाहून त्यांना नकार दिला होता. मात्र नंतर यांना सरकारी नोकरी लागली आणि माझ्यासह संपूर्ण कुटुंबाने त्यांना होकार दिला. सरकारी नोकरीमुळे मी आज यांची पत्नी असल्याचंही ती म्हणते.
  हा व्हिडीओ memecentral.teb नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Central government, Jobs, Viral video on social media

  पुढील बातम्या