मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अपना Quarter, अपना Glass! निवडणुकीत उमेदवाराचा अजब नारा, स्वतःलाच दिल्या भरपेट शिव्या

अपना Quarter, अपना Glass! निवडणुकीत उमेदवाराचा अजब नारा, स्वतःलाच दिल्या भरपेट शिव्या

आपण या जगातील सर्वात नालायक उमेदवार असून (Strange poster of a candidate) आपल्याला निवडून द्या, असं जाहीर आवाहन एका उमेदवारानं पोस्टर लावून केलं आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : आपण या जगातील सर्वात नालायक उमेदवार असून (Strange poster of a candidate) आपल्याला निवडून द्या, असं जाहीर आवाहन एका उमेदवारानं पोस्टर लावून केलं आहे. अपना क्वार्टर, अपना ग्लास असा नारा देत त्याने मतदारांना  (Candidate criticizes himself in poster) आपण पारदर्शी असल्याचं सांगितलं आहे. या पोस्टरची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू असून या अनोख्या कल्पनेवर अनेकांनी सडकून टीकादेखील केली आहे.

काय आहे पोस्टर?

हे पोस्टर स्वतः उमेदवारानं लावलं आहे की इतर कुणी त्याची मस्करी केली आहे, असा प्रश्न हे पोस्टर पाहून पडतो. कारण यात उमेदवार स्वतःलाच शिव्या घालत असल्याचं दिसतं. आपण स्वतः 'कमीने, नालायक आणि दारुवाले' आहोत, अशी कबुलीच या उमेदवाराने पोस्टरमधून दिली आहे. त्याखाली आपण सरपंचपदासाठी निवडणूक लढवत असून आपल्याला भऱघोस मताने निवडून देण्याचं आवाहनदेखील त्यानं केलं आहे.

स्वतःवर टीका

साधारणतः कुठल्याही निवडणुकीच्या प्रचारासाठी पोस्टर लावलं जातं, तेव्हा उमेदवाराची स्तुती केली जाते. उमेदवाराचं काम, त्याचं कर्तृत्व आणि इतर बाबींचं तोंड भरून कौतुक केलं जातं. मात्र या पोस्टरमध्ये नेमकं उलट चित्र दिसतं. उमेदवारानं स्वतःलाच भरपेट शिव्या दिल्या आहेत. याबाबत उमेदवाराशी संपर्क साधला असता त्यानं दिलेलं कारण ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. निवडणुकीत सगळेच खोटं बोलून मतं मिळवतात. मात्र आपण जसे आहोत, तसेच जगासमोर जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. खोटं बोलून आपल्याला मतं मिळवायची नसून आपला खरा चेहरा जगासमोर आणूनच मतं मागत असल्याचा दावा या उमेदवाराने केला आहे.

हे वाचा - BREAKING: 2-18 वयोगटासाठी Covaxin लशीला मान्यता, लवकरच सुरू होणार लसीकरण

उमेदवाराचा पराभव

ज्या निवडणुकीसाठी हा उमेदवार उभा होता, त्या निवडणुका झाल्या असून त्यात उमेदवाराचा पराभव झाला आहे. खरं बोलूनही हा उमेदवार काही निवडून येऊ शकला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र त्या निमित्तानं या उमेदवाराची देशभर चर्चा होत असून सोशल मीडियात हे पोस्टर जोरदार व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Election, PHOTOS VIRAL