मराठी बातम्या /बातम्या /Viral /भिंतीतून येत होता विचित्र आवाज, यामागचं गुढ उलगडलं तेव्हा कुटुंबीयांना बसला धक्का

भिंतीतून येत होता विचित्र आवाज, यामागचं गुढ उलगडलं तेव्हा कुटुंबीयांना बसला धक्का

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

विचार करा की तुम्ही घरी झोपलायत आणि तितक्या तुमच्या घराच्या भिंतीमधून विचित्र आवाज येऊ लागला तर?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : रात्रीच्या अंधारात बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की कुणीतरी मला पाहातंय किंवा कुणी माझा पाठलाग तर करत नाहीय ना? हे सगळं खरतर आपल्या मानाचा खेळ असतो, पण असं असलं तरी देखील अनेकांना याची भीती वाटते. त्याच विचार करा की तुम्ही घरी झोपलायत आणि तितक्या तुमच्या घराच्या भिंतीमधून विचित्र आवाज येऊ लागला तर? नक्कीच असा प्रकार कोणालाही घाबरवू शकतो.

व्यक्ती कितीही घाबरला असला तरी हा नक्की प्रकार काय आहे? हे पाहण्यासाठी आणि आपल्या मनाची शांती करण्यासाठी तेथे जाऊन पाहिल किंवा मग तेथून पळून जाईल. असंच काहीस एका व्यक्तीसोबत घडलं आहे. त्याला त्याच्या बेडरुममधील भिंतीमधून विचित्र आवाज येऊ लागला, जेव्हा त्याने भिंतीमागे काय आहे हे पाहिलं तेव्हा मात्र त्याला धक्काच बसला.

बिबट्या दररोज शेतात येऊन करतो काय? शेतकऱ्याने CCTV पाहिला आणि त्याला धक्काच बसला

ही घटना इंग्लंडमधील ईस्ट लिंकनशायरमधील आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, एका घराच्या भिंतीच्या मागून विचित्र आवाज येत होता, त्यांना आधी वाटले की त्यांच्या भिंतीच्या मागे कोणीतरी पक्षी अडकला आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत वन्यजीव बचाव पथकाला सांगितले. हे ऐकून पथकही सक्रिय झाले. मात्र ते घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी घरातील सदस्यांनी भिंत तपासली असता त्यांच्यासमोर विचित्र प्रकार आला.

क्लीथॉर्प्स वाइल्डलाइफ रेस्क्यूने (Cleethorpes Wildlife Rescue)आपल्या फेसबुक अकाउंटवर संपूर्ण घटना शेअर केली आहे. भिंतीला छिद्र किंवा आत डोकावायला वाव नसल्याने त्यामागे कोणता पक्षी अडकला हे गूढच असल्याचे त्यांनी सांगितले. पण बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्याआधीच त्यांना फोन आला की तो काय प्रकार आहे हे कुटुंबीयांच्या लक्षात आलं होतं.

हॅरी पॉटर या हॉलिवूड चित्रपटातील टिट्यूलर कॅरेक्टर या पात्राकडे एक घुबड होते. हा घुबड खेळणीच्या रुपात या कुटुंबीयांच्या घरी होता, जो एका सोफ्याखाली पडला होता. जो रॅकॉर्ड केलेलं आवाज काढत होता. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.

याघटनेबाबत रेस्क्यू टीमने सांगितलं की नशिबाने तेथे कोणता पक्षी नव्हता, पण आम्ही देखील आमच्या बाजूने या ऑपरेशनसाठी तयार होतो.

First published:

Tags: Shocking, Social media, Top trending, Viral