नवी दिल्ली, 8 डिसेंबर: एका तरुणीनं स्वतःच्या नखांवर चहाचं गाळणं बनवून घेतलं आहे. हा प्रकार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून ही कमाल तरुणीनं कशी काय केली, याचं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करत असतात. कुणी काही करामती करून दाखवतं, तर कुणी इतरांची फजिती करून लक्ष वेधून घेण्यात धन्यता मानतं. मात्र एका तरुणीनं आपल्या नखांचा वापर करून अशी काही कमाल केली आहे, की पाहणारा प्रत्येकजण आश्चर्यचकित होऊन तोंडात बोट घालत आहे.
View this post on Instagram
अशी साकारली कला
इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत तरुणीच्या नखांवर स्ट्रेन नेल आर्ट साकारली जात असल्याचं दिसतं. अगोदर नखांच्या खाली असणाऱ्या रिकाम्या जागेत एक स्ट्रक्चर लावलं जातं. त्यानंतर चाळणीसारखा एक धातू त्यावर लावून तो स्ट्रेनरच्या साहाय्यानं खेचून बसवण्यात येतो. ही कृती पूर्ण झाल्यानंतर त्या रचनेला चहाच्या गाळण्याचं रूप येतं. मात्र हे चहाचं गाळणं केवळ दिखाऊ किंवा शो पुरतं नाही, तर प्रत्यक्षात त्याने चहा गाळणं शक्य आहे. तरुणीनं या व्हिडिओत चहा गाळण्याचं प्रात्यक्षिकही करून दाखवलं आहे. जेव्हा यातून चहा गाळला जातो, तेव्हा चहाची पूड, इलायची आणि इतर ऐवज नखाच्या गाळण्यात अडकून बसतो आणि गाळीव चहा खाली जातो.
लोकांना वाटलं आश्चर्य
सध्या सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र त्यातील काही व्हिडिओ हे खरोखरच कल्पक असतात. आपल्या नखांचा मानव कशा पद्धतीने उपयोग करू शकतो, यावर आतापर्यंत बरचसं संशोधन झालं आहे. मानवानं वेगवेगळ्या पद्धतीनं नखांचा वापर केला आहे. मात्र चहाच्या गाळण्यासाठी नखांचा वापर करण्याची ही कदाचित पहिलीच पद्धत असल्याचं दिसून येत आहे.
हे वाचा -
सोशल मीडियावर कौतुक
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्याला आतापर्यंत 2 2 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. दिवसेंदिवस या व्हिडिओला मिळणारी पसंती वाढत चालली असून अनेकजण हा प्रयोग करू लागले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.