कराची 28 नोव्हेंबर : जगभरातील अनेक देशांमध्ये अतिशय विचित्र कायदे आणि नियम आहेत. काही देशांतील कायदे तर हैराण करणारे आहेत. जगातील अनेक देशांमध्ये गर्लफ्रेंडबाबतही निरनिराळे कायदे आहेत. आपला शेजारी देश असलेल्या पाकिस्तानातही असाच एक कायदा आहे (Strange laws in Pakistan). ज्याबद्दल ऐकून तुमचा यावर विश्वासही बसणार नाही. पाकिस्तानात कोणताही तरुण गर्लफ्रेंड बनवू शकत नाही (Strange laws about Girlfriend in Pakistan).
पाकिस्तानाच एखादा मुलगा गर्लफ्रेंडसोबत पकडला गेला तर त्याला थेट तुरुंगात पाठवलं जातं. पाकिस्तानात कोणताही मुलगा मुलीसोबत मैत्री ठेवू शकत नाही. पाकिस्तानात याबाबत अतिशय कडक कायदा आहे, की लग्नाआधी मुलगा आणि मुलगी एकत्र राहू शकत नाहीत.
पाकिस्तानप्रमाणेच संयुक्त अरब अमीरात म्हणजेच UAE मध्येही गर्लफ्रेंडबाबत अजब कायदे आहेत. इथे कोणताही तरुण सर्वांसमोर आपल्या गर्लफ्रेंडचा हात पकडू शकत नाही. इतकंच नाही तर एखादा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी आपल्या गर्लफ्रेंडसोबत दिसल्यास त्याच्याविरोधात कारवाई केली जाते. इथे कपलला किस करण्याची आणि एकमेकांची गळाभेट घेण्याचीही परवानगी नाही.
आपला शेजारी देश असलेल्या चीनमध्ये भाड्याने गर्लफ्रेंड मिळते. इथे सिंगल लोकांना गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागत नाहीत. कारण इथे त्यांना भाड्याने गर्लफ्रेंड म्हणून मुलगी मिळते. चीनच्या गुआंडोंगमध्ये सुंदर आणि तरुण मुलींना कोणीही पुरुष पसंत करतात आणि भाड्याने गर्लफ्रेंड बनवून आपल्यासोबत घेऊन जातात.
चीनमध्ये भाड्याने गर्लफ्रेंड घेण्याची पद्धत असली तरीही मुलीच्या परवानगीशिवाय तिचा हात तुम्ही पकडू शकत नाही. जेव्हापर्यंत ही तरुणी परवानगी देणार नाही, तोपर्यंत तुम्ही तिला स्पर्शही करू शकत नाही. तिनं परवानगी दिल्यावरच तिला हात लावण्याची परवानगी मिळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Girlfriend, Viral news