Home /News /viral /

मित्रांनी लग्नात दिलं भलंमोठं गिफ्ट, सत्य समजल्यावर उडाले हास्याचे कारंजे; पाहा VIDEO

मित्रांनी लग्नात दिलं भलंमोठं गिफ्ट, सत्य समजल्यावर उडाले हास्याचे कारंजे; पाहा VIDEO

लग्नाला आलेल्या मित्रांनी वधूवरांना असं काही गिफ्ट दिलं की पाहणारे सगळे खो-खो हसू लागले.

  नवी दिल्ली, 9 डिसेंबर: एका लग्नात वधुवरांच्या मित्रांनी (Friends of bride and groom) त्यांना असं एक गिफ्ट (Strange gift) दिलं जे पाहिल्यानंतर सर्वांनाच हसू फुटलं. लग्नात वधू आणि वराचे नातेवाईक त्यांना स्टेजवर (Wishes to bride and groom) जाऊन भेटत असतात. दोन्हीकडचे नातेवाईक एकामागून एक स्टेजवर जात नवविवाहित जोडप्याला भेटून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत असतात. त्यांना भेटून त्यांच्याशी चार शब्द बोलून आणि त्यांना भेटवस्तू देऊन परत खाली उतरतात. अशा प्रसंगी वधू आणि वरांचे मित्र तर आणखीच धमाल करतात. अशा वेळी लग्न झालेल्या मित्राची थट्टामस्करी करण्याला ऊत आलेला असतो. असाच काहीसा प्रकार नुकत्यात घडलेल्या एका घटनेतून समोर आला.
  स्टेजवर आणला भलामोठा बॉक्स इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाच ते सहा मित्र स्टेजवर एक भलामोठा बॉक्स घेऊन येताना दिसतात. पहिल्यांदा हा बॉक्स पाहिल्यानंतर त्यात काहीतरी भलीमोठी आणि किंमती वस्तू असेल, असं वाटतं. त्यात कदाचित फ्रिज किंवा वॉशिंग मशीन असेल, असं वाटल्यामुळे सर्वांचंच लक्ष त्याकडे वेधलं गेलं. लग्नाच्या हॉलच्या गेटपासून ते स्टेजपर्यंत सर्व मित्रांनी मिळून हा बॉक्स अशा थाटात उचलून आणला की जणू त्यात काही वजनदार वस्तू असावी. हा बॉक्स घेऊन मित्रमंडळी स्टेजपाशी आली. त्यानंतर एखादी जड वस्तू स्टेजवर चढवावी, तशा ढंगात त्यांनी तो बॉक्स स्टेजवर चढवला आणि नवविवाहित दांपत्याला गिफ्ट केला. हे वाचा - 9 वर्षांच्या मुलीला भावोजीनं दिल्या नरकयातना, 4 महिन्यानंतर 'अशी' समजली आपबिती उत्कंठा आणि हसू स्टेजवर नेमकं काय घडतंय, याकडं सर्व उपस्थितांचं लक्ष होतं. आता बॉक्समधून कुठली वस्तू बाहेर येणार, याची सर्वजण वाट पाहत होते. मात्र त्या बॉक्समध्ये काहीच नव्हतं. तो एक रिकामा बॉक्स असल्याचं जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं, तेव्हा हॉलमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. व्हिडिओ होतोय व्हायरल या प्रँकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्याला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ही एक उत्तम कल्पना असल्याचं म्हटलं आहे, तर अनेकांना लग्नात अशी थट्टा करणं योग्य नाही, असं वाटत आहे.
  Published by:desk news
  First published:

  Tags: Marriage, Video viral

  पुढील बातम्या