Home /News /viral /

बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का?

बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का?

Strange creature in texas zoo : या विचित्र जीवाला ओळखण्यासाठी प्राणीसंग्रहायलातील अधिकाऱ्यांनी नागरिकांची मदत मागितली आहे.

    वॉशिंग्टन, 15 जून : जगात असे बरेच जीव आहेत, ज्यांना आपण अद्याप पाहिलं नाही आहे. असे जीव दुर्मिळ असतात आणि सामान्य माणसं सोडा अगदी प्राणी तज्ज्ञांनाही अशा जीवांबाबत फारशी माहिती नसते. सध्या अशाच एका जीवाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अमेरिकेतील एका प्राणीसंग्रहायलात हा विचित्र जीव दिसला आहे. ज्याला पाहून प्राणीसंग्रहायलातील अधिकारीही हैराण झाले आहेत. हा जीव नेमका कोण असा प्रश्न त्यांनाही पडला आहे. त्यामुळे या जीवाला ओळखण्यासाठी आता त्यांनी नागरिकांची मदत मागितली आहे (Strange creature in Texas Zoo). टेक्सासमधील द अमारिलो झूमध्ये एक विचित्र जीव दिसला. हा जीव प्राणीसंग्रहालयाबाहेर फिरत होता. तो नेमका कोण हे स्पष्टपणे दिसलं नाही. पण त्याची आकृती दिसली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा जीव दोन पायांवर उभा असल्याचं दिसत आहे. माणसांप्रमाणे त्याला दोन पाय आहेत. पण त्याचे कान मोठे आणि टोकदार असल्याचे दिसत आहेत. हा नेमका कोणता जीव आहे हे कुणालाच समजू शकलं नाही आहे. झूमधील अधिकारीही या प्राण्याला पाहून आश्चर्यचकीत झाले. हा प्राणी नेमका कोण आहे, हे अधिकाऱ्यांनाही समजेना. हे वाचा - 40 हून अधिक मगरींनी सिंहाला घेरलं; घाबरून जंगलाच्या राजाने घेतली पाण्यात उडी अन्..., पाहा VIDEO चा शेवट एनएनआय वृत्तसंस्थेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या जीवाचा फोटो शेअर केला आहे. टेक्सास प्राणीसंग्रहायलाच्या अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद झालेल्या या विचित्र जीवाला ओळखण्यासाठी नागरिकांची मदत मागितली असल्याचं एएनआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सिटी ऑफ अमारिलो, टेक्सासने फेसबुकवरही याबाबत पोस्ट केली आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार अमारिलो झूबाहेर 21 मे रोजी रात्री दीडच्या सुमारास एक विचित्र जीव अंधारात कॅमेऱ्यात कैद झाला. हा जीव टोपीवाला माणूस आहे, ज्याला रात्री चालायला आवडतं, की यूएओ असू शकतो. हे वाचा - पर्यटकांना व्याघ्र दर्शन; ताडोबातील दुर्मिळ दृश्य व्हायरल, पाहा वाघांच्या कळपाचा VIDEO हा फोटो पाहिल्यानंतर नेटिझन्सनी हा जीव कोण असावा याबाबत आपाआपली मतं व्यक्त केली आहेत. कुणी याला एलियन म्हटलं आहे, तर कुणी छुपकाबरा म्हटलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral

    पुढील बातम्या