Home /News /viral /

मासेमारी करण्याचा असा जबरदस्त जुगाड कधी पाहिला आहे का? पहा VIDEO

मासेमारी करण्याचा असा जबरदस्त जुगाड कधी पाहिला आहे का? पहा VIDEO

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन व्यक्ती एका बर्फाळ ठिकाणी मासे पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत एक व्यक्ती बर्फाच्या मध्यभागी बनवलेल्या छोट्या खड्ड्यात बादली मारताना दिसत आहे.

  नवी दिल्ली, 9 मे : मासेमारी करताना तुम्ही अनेकांना पाहिलं असेल, पण सोशल मीडियावर मासेमारीचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती एकदम वेगळ्या स्टाईलमध्ये मासेमारी करताना दिसत आहेत. मासेमारी ही देखील एक कला मानली जाते. अनेक भागात मासे लोक पकडून आपला निर्वाह चालवतात. पण माशांसाठी जाळं टाकणं खूप सोपं आहे, परंतु, त्यात मासं पकडणं फार कठीण आहे. यामुळे लोक मासेमारीसाठी वेगवेगळ्या पद्धती वापरताना दिसतात. अशीच एक मासेमारीची स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हे मासे कोणत्याही तलावातून किंवा नदीतून नव्हे तर, बर्फाच्या आतील पाण्यातून पकडले जात आहेत. व्हिडिओ पाहून तुम्हीही या स्टाईलचे चाहते व्हाल.
  व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन व्यक्ती एका बर्फाळ ठिकाणी मासे पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत एक व्यक्ती बर्फाच्या मध्यभागी बनवलेल्या छोट्या खड्ड्यात बादली मारताना दिसत आहे. त्यानंतर एक व्यक्ती एक प्रकारची लहान जाळी घेऊन आत टाकत आहे आणि हलवून बाहेर काढत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात मासे येऊन बाहेर पडत आहेत. हे वाचा - Wedding Video: गुरुजी बोलावत राहिले...नवरदेव वाट पाहत राहिला; नवरी मात्र... इन्स्टाग्रामवर मासेमारीचा हा उत्तम व्हिडिओ onlyfornatures पेजवरून शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओला 60 हजारांहून अधिक लोकांनी लाइकही केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर मोठ्या संख्येने लोकांनी कमेंटही केल्या आहेत. तुम्हालाही हा व्हिडिओ पाहायचा असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या इन्स्टाग्राम लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Fish, मच्छिमार

  पुढील बातम्या