मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चुकूनही डायल करू नका हे 5 नंबर, Ring झाली तर सुरु होईल साडेसाती

चुकूनही डायल करू नका हे 5 नंबर, Ring झाली तर सुरु होईल साडेसाती

जगभरात असे पाच नंबर आहेत, ज्यांची प्रत्येक मोबाईल (story of most horrific numbers in the world not to dial ever) युजरला कमालीची भीती वाटते.

जगभरात असे पाच नंबर आहेत, ज्यांची प्रत्येक मोबाईल (story of most horrific numbers in the world not to dial ever) युजरला कमालीची भीती वाटते.

जगभरात असे पाच नंबर आहेत, ज्यांची प्रत्येक मोबाईल (story of most horrific numbers in the world not to dial ever) युजरला कमालीची भीती वाटते.

  • Published by:  desk news

जगभरात असे पाच नंबर आहेत, ज्यांची प्रत्येक मोबाईल (story of most horrific numbers in the world not to dial ever) युजरला कमालीची भीती वाटते. या पाच नंबर्सना फोन लावणं तर सोडा, हे नंबर डायल करण्याच्या कल्पननेनंही अनेकांना घाम फुटतो. कारण आतापर्यंत हे नंबर (Terrific experiences after dialing the numbers) डायल केल्यावर काय होतं, याचे अनेक भयंकर अनुभव नागरिकांना आले आहेत. सध्याच्या काळात मोबाईल हा (Mobile inevitable part of life) प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलशिवायच्या आयुष्याची कल्पनादेखील अनेकांना करता येणार नाही. मात्र हे आयुष्य शांततेत आणि कुठल्याही संकटाशिवाय जगायची इच्छा असेल, तर हे पाच नंबर कधीही डायल न करण्याचा सल्ला दिला जातो.

09044444444

जपानी लोकांसाठी हा नंबर सर्वाधिक घाबरवणारा आहे. या नंबरसोबत राक्षसी शक्ती जोडल्या गेल्या आहेत, अशी समजूत जपानी नागरिकांची आहे. हा नंबर डायल केला, तर पलिकडून चित्रविचित्र आवाज ऐकू येतात. ते आवाज ऐकल्यावर पुढच्या आठ दिवसांत व्यक्तीचा मृत्यू होतो, असा समज जपानमध्ये पसरला आहे. अर्थात, याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसला, तरी जपानी नागरिकांमध्ये दबक्या आवाजात याची सतत चर्चा सुरू असते.

12074042604

तसं पाहिलं तर हा एक सामान्य मोबाईल नंबर आहे असं वाटतं. मात्र ज्याने ज्याने हा नंबर डायल केला, त्याला भूत दिसायला सुरुवात होते, असं मानलं जातं. हा नंबर सर्वात पहिल्यांदा दिसला होता Carrie (2013) या हॉरर चित्रपटात.

Red Numbers

2004 साली नायजेरियात रेड नंबर्सची कमालीची दहशत पसरली होती. कुठल्याही नागरिकानं Red Numbers वरून आलेले कॉल रिसिव्ह करू नयेत, असे आदेश खुद्द सरकारनं काढले होते. या नंबरवरून आलेल्या फोनवर कमालीच्या तारस्वरातील काही आवाज ऐकून येत असत. हे आवाज ऐकून कान आणि मेंदूवरही परिणाम होतो, अशी भीती व्यक्त करण्यात येते.

हे वाचा- क्रूरतेचा कळस! सळईने मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यू,पुण्यातील मन हेलावणारी घटना

20202020

युकेमध्ये सत्तरच्या दशकात फोन बुथ असायचे. तिथून कुणालाही फोन लावायला पैसे आकारले जायचे. मात्र या नंबरवर लागलेल्या फोनचं बिलच यायचं नाही. या नंबरवर एक महिला किंचाळत असून मदतीची याचना करत असल्याचे आवाज ऐकू यायचे.

First published:

Tags: Viral, Viral news