मुलीच्या बर्थडे सेलिब्रेशनदरम्यानच सावत्र आईचं विचित्र कृत्य; VIDEO पाहून भडकले नेटकरी
मुलीच्या बर्थडे सेलिब्रेशनदरम्यानच सावत्र आईचं विचित्र कृत्य; VIDEO पाहून भडकले नेटकरी
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की आपल्या बर्थडेसाठी अतिशय एक्साइटेड असणारी मँडी आपल्या केकवर लावण्यात आलेल्या मेणबत्ती फुंकणारच इतक्यात तिच्या सावत्र आईनं हे कृत्य केलं
नवी दिल्ली 06 सप्टेंबर : एका सावत्र आईनं आपल्या मुलीच्या वाढदिवशीच (Birthday Celebration) असं काही केलं जे पाहून मुलगी प्रचंड संतापली. या महिलेनं बर्थडे केकवर लावण्यात आलेल्या मेणबत्त्या रागात विझवून टाकल्या. काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. जॉर्जियाच्या (Georgia) अटलांटा येथे राहणारी मँडी बुई (Mandy Bui) आपल्या 19 व्या वाढदिवशी कुटुंबीयांसोबत डिनरसाठी बाहेर गेली होती. एकत्र आलेल्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी तिच्यासाठी बर्थडेचं गाणंही गायलं. या दरम्यान ती आपल्या बर्थडे केकवरील मेणबत्ती फुकण्यासाठी वाट पाहत होती. मात्र, इतक्यात तिच्या सावत्र आईनं हे विचित्र कृत्य केलं.
VIDEO : 180 किमी प्रतितास वेगानं धावणाऱ्या कारवर झोपला तरुण; विचित्र स्टंट भोवला
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की आपल्या बर्थडेसाठी अतिशय एक्साइटेड असणारी मँडी आपल्या केकवर लावण्यात आलेल्या मेणबत्ती फुंकणारच इतक्यात तिच्या सावत्र आईनं हे कृत्य केलं. यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला. मँडी जेव्हा आपल्या वडिलांसोबत बोलण्यात काही सेंकद व्यग्र झाली इतक्यात सावत्र आईनं सर्व मेणबत्ती विझवल्या. मँडीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहूनच कळत की सावत्र आईच्या या कृत्यामुळे ती प्रचंड चिडली आहे.
'एक विवाह ऐसा भी'! 90 वर्षीय वृद्धानं केलं 75 वर्षाच्या महिलेसोबत लग्न
LADbible सोबत बोलताना मँडीनं म्हटलं, की बर्थडेच्या वेळी मी आणि माझ्यासोबत असलेले लोक Happy Birthday गात होते. मी बर्थडे केकवरील मेणबत्ती लगेच विझवली नाही कारण माझे वडील काहीतरी बोलत होते. मी त्यांच्याकडे पाहण्यात व्यग्र असतानाच सावत्र आईनं माझ्या केकवरील मेणबत्ती विझवली. यामुळे मला खूप वाईट वाटलं आणि मी तिच्याकडे पाहत राहिले.
just went to my bday dinner and my bitch ass stepmom blew out my candles like ????? the reaction i had pic.twitter.com/0w7d6C6IuP
मँडी पुढे म्हणाली, मी तिच्यावर खूप नाराज होते कारण माझे तिच्यासोबत चांगले संबंधही नाहीत आणि मला असं वाटलं की तिनं हे सगळं मला राग आणून देण्यासाठीच केलं. आठ सेकंदाचा हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ 2 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.