मुंबई, 4 जून : WWE सुपरस्टार दलीप सिंह राणा उर्फ 'द ग्रेट खली' (The Great Khali) हा भारतामध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. यावर्षी झालेल्या Wrestlemania 2021 मध्ये खली सहभागी झाला होता. तो सध्या त्याच्या कुटुंबीयांसोबत भारतामध्ये राहतो. खली सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच सक्रीय असून तिथे तो त्याचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सर्वांशी शेअर करत असतो.
खलीच्या सोशल मीडियावरील पोस्ट भारतामध्ये चांगल्याच लोकप्रिय होतात. त्याचवेळी त्याच्या कमेंट्समध्ये अनेक मजेदार आणि अजब विनंती देखील फॅन्स करत असतात. खलीच्या अफाट शक्तीवर त्याच्या फॅन्सना मोठा विश्वास आहे. त्यामुळे ते अनेकदा अशक्य गोष्टी करण्याची विनंती खलीला करतात.
खलीच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवर कॉमेडियन अभिषेक ( Abhishek Upmanyu) यानं एक मजेदार विनंती केली असून ती सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. 'सर, चंद्र तोडून रात्र संपवून टाका' अशी विनंती अभिषेकनं खलीला केली आहे. त्याची ही प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल झाली असून त्याला 2 हजार पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
खलीने 2000 साली पदार्पण केले. त्यानंतर 2006 पासून त्याने WWE खेळण्यास सुरुवात केली. त्याने 2007 साली वर्ल्ड हेविवेट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो एकमेव भारतीय आहे. त्याचबरोबर त्याने 2007 साली रॉयल रम्बल स्पर्धा देखील जिंकली आहे.
मिल्खा सिंग पुन्हा ICU मध्ये दाखल, तीन दिवसांपूर्वीच मिळाला होता डिस्चार्ज
खलीचा 2021 मध्ये 'WWE हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश करण्यात आला आहे. खलीने व्यावसायिक करियरसोबतच अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमातही काम केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Viral post, Wrestler