मराठी बातम्या /बातम्या /Viral /

टीशर्टवरच प्रिंट केलं Corona Vaccine सर्टिफिकेट, कारण ऐकून तुम्हीही म्हणाल...What an Idea Sirji

टीशर्टवरच प्रिंट केलं Corona Vaccine सर्टिफिकेट, कारण ऐकून तुम्हीही म्हणाल...What an Idea Sirji

प्रवाशांकडे वॅक्सिनेशन सर्टिफिकेट असणं गरजेचं असून विमान प्रवास करताना विमानतळावर तसंच लोकल प्रवासावेळी ते दाखवणं आवश्यक आहे.

  नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : देशात कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट काहीशी ओसरत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत तुलनेने कमी येत असून देशातील अनेक राज्यांत परिस्थिती काहीशी नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. विमान प्रवास तसंच मुंबईतही लोकल प्रवासासाठी आता परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी, प्रवास करण्याआधी प्रवाशांनी कोरोना लस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रवाशांकडे वॅक्सिनेशन सर्टिफिकेट असणं गरजेचं असून विमान प्रवास करताना विमानतळावर तसंच लोकल प्रवासावेळी ते दाखवणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ऑगस्टपासून कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना लोकलने प्रवास करता येणार असल्याची घोषणा केली आहे. तसंच प्रवास करताना लस घेतल्याचं प्रमाणपत्र आणि क्यूआर कोडही आवश्यक आहे. यावरुन स्डँडअप कॉमेडिअन अतुल खत्री यांनी एक फोटो शेअर केला आहे.

  VIDEO:'900 रुपयांत काही मिळो न मिळो,आयुष्य नक्कीच मिळतं',तरुणीची कारला धडक आणि..

  अतुल खत्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक पांढऱ्या रंगाचं टीशर्ट घातलेला भन्नाट फोटो पोस्ट केला आहे. त्यांच्या टीशर्टवर कोविड-19 वॅक्सिनेशन सर्टिफिकेट प्रिंट असल्याचं दिसतंय. त्यांनी फोटो पोस्ट करत, 'काम आणि प्रवास आता पुन्हा सुरू झाला आहे. विमानतळावर, हॉटेल इत्यादी ठिकाणी कोरोना वॅक्सिनेशन सर्टिफिकेट दाखवून कंटाळा आल्याने ही कल्पना सुचल्याचं' त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. सध्याच्या परिस्थितीत त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेक नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Corona vaccination, Photo viral

  पुढील बातम्या