मराठी बातम्या /बातम्या /Viral /अपघात झाला पण हार मानली नाही, 10 वीच्या विद्यार्थिनीने अ‍ॅम्ब्युलन्समध्ये दिली परीक्षा

अपघात झाला पण हार मानली नाही, 10 वीच्या विद्यार्थिनीने अ‍ॅम्ब्युलन्समध्ये दिली परीक्षा

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई: सध्या राज्यात 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षांदरम्यान एका मुलीने अ‍ॅम्ब्युलन्समध्ये पेपर सोडवल्याची बातमी समोर आली आहे. मुबश्शिरा सय्यद असं या मुलीचं नाव आहे. तिचा दृढनिश्चय आणि दोन शाळा तसेच राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे ही विद्यार्थिनी सोमवारी एसएससी परीक्षा देऊ शकली. तिने रुग्णवाहिकेत झोपून रायटरच्या मदतीने प्रश्नपत्रिका सोडवली. तीन दिवसांपूर्वी कार अपघातात तिच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती, त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू होते. पण तिने हिंमत दाखवत परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात 'टाइम्स ऑफ इंडिया'ने वृत्त दिलंय.

    वांद्रे येथील अंजुमन-इ-इस्लामच्या डॉ. एमआयजे गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी मुबश्शिरा सध्या सुरू असलेल्या एसएससी परीक्षेला बसली आहे. शुक्रवारी सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल, वांद्रे इथं तिने विज्ञानाचा पेपर 2 (बायोलॉजी) सोडवला आणि ती दुपारी 1.20 च्या सुमारास घरी जात होती, तेव्हा ती रस्ता ओलांडत असताना एक कार तिच्या डाव्या पायावरून गेली. यामुळे तिच्या पायाला दुखापत झाली.

    जेव्हा माकडाने स्वत:लाच पाहिले आरशात, पुढे काय घडलं? पाहा मजेदार व्हिडीओ

    मुबश्शिरा सय्यदने सोमवारी अॅम्ब्युलन्समध्ये तिची दहावीची परीक्षा दिली. शुक्रवारी ती शाळेतून घरी जात असताना एक कार तिच्या पायावरून गेली होती. ड्रायव्हरने मुबश्शिराच्या बॅचमेट्ससह तिला जवळच्या होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये नेले, त्याच दिवशी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी तिला दोन आठवडे पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आणि रविवारी तिला डिस्चार्ज दिला. कुटुंबीयांनी चालकावर कोणताही आरोप किंवा गुन्हा दाखल केलेला नाही. "तिला उर्वरित पेपर लिहू न शकल्याचं दु:ख दुखापतीच्या दु:खापेक्षा जास्त होतं. पण जेव्हा तिच्या हातात प्रश्नपत्रिका आली तेव्हा कॉन्फिडंट आणि पॉझिटिव्ह वाटत होती," असं सिस्टर अँथनी म्हणाल्या.

    अ‍ॅम्ब्युलन्स एक्झाम सेंटरच्या कंपाउंडमध्ये पार्क करण्यात आली होती. तिच्या प्रिन्सिपल सबा कुरेशी म्हणाल्या की विद्यार्थिनीचे पालक पेशाने ड्रायव्हर आहेत. तिला ही परीक्षा द्यायचीच होती. त्यामुळे आम्ही तिच्या अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी तिला रायटर मिळावा, यासाठी बोर्डाकडे परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यावर आम्ही अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. शिक्षकांनी या परिस्थितीत तिला आर्थिक मदत केली. 9 तील विद्यार्थिनी नूरसबा अन्सारी मुबाश्शिराची रायटर बनायला तयार झाली. सोमवारी सकाळी 10.15 वाजता तिला परीक्षेसाठी आणण्यात आलं.

    तिला सकाळी 11 वाजता पेपर मिळाला आणि दुपारी 1.10 पर्यंत तिच्या लेखिकेने तिने सांगितलेली उत्तरं लिहिली, असं डॉ शेख यांना सांगितलं. सेंट स्टॅनिस्लॉसच्या मुख्याध्यापिका, सिस्टर अॅरोकीअमल अँथनी यांनी रुग्णवाहिकेच्या आत या दोन विद्यार्थिनींचे पर्यवेक्षण करण्याचे मान्य केले. त्या शिवाय तिथे एक पोलीस आणि शाळेचा एक शिपाई उपस्थित होते. “तो एक नवीन अनुभव होता. रुग्णवाहिका निगेटिव्हीटीशी निगडीत आहे, पण इथे एक विद्यार्थिनी होती जी तिच्या हातात प्रश्नपत्रिका मिळाल्यावर कॉन्फि़डंट आणि पॉझिटिव्ह उर्जेने आनंदी झाली होती,” असं सिस्टर अँथनी म्हणाल्या.मुबश्शिरा म्हणाली, उत्तर पत्रिकेत उत्तर लिहिणं हे लेखकाला उत्तरं सांगण्यापेक्षा वेगळं आहे.

    “मला परीक्षेला बसायला मिळाल्याचा मला आनंद आहे. हातात फक्त प्रश्नपत्रिका दोन तासांहून अधिक काळ धरून ठेवणं आणि दुसऱ्याने तुमची उत्तरं लिहिताना पाहणं विचित्र वाटत होतं, तरी मला ही संधी सोडायची नव्हती.” असं ती म्हणाली. ती पेपर देताना खूश होती आणि 23 मार्च आणि 25 मार्च रोजी ती शेवटचे दोन पेपर्सही अ‍ॅम्ब्युलन्समध्येच देणार आहे.

    First published:
    top videos

      Tags: Shocking, Social media, Top trending, Viral