मराठी बातम्या /बातम्या /Viral /जेवणाबाबतचा 'हा' नियम मोडल्यामुळे स्पाइसजेटचे दोन पायलट अडचणीत; काय आहे प्रकरण?

जेवणाबाबतचा 'हा' नियम मोडल्यामुळे स्पाइसजेटचे दोन पायलट अडचणीत; काय आहे प्रकरण?

जेवणाबाबतचा 'हा' नियम मोडल्यामुळे स्पाइसजेटचे दोन पायलट अडचणीत; जाणून घ्या काय आहे प्रकरण

जेवणाबाबतचा 'हा' नियम मोडल्यामुळे स्पाइसजेटचे दोन पायलट अडचणीत; जाणून घ्या काय आहे प्रकरण

उत्तर भारतामध्ये गुजिया म्हणजेच करंजी या खाद्यपदार्थाशिवाय होळीचा सण अधूरा मानला जातो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

    नवी दिल्ली, 21 मार्च : काही दिवसांपूर्वीच होळीचा सण होऊन गेला. उत्तर भारतामध्ये गुजिया म्हणजेच करंजी या खाद्यपदार्थाशिवाय होळीचा सण अधूरा मानला जातो. मात्र, आता याच करंज्यांनी स्पाइस जेटमधील दोन पायलट्सच्या आयुष्यात वादळ आणलं आहे. स्पाइसजेटच्या दिल्ली-गुवाहाटी फ्लाईटमधील कॉकपिटचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो 8 मार्च म्हणजेच होळीच्या दिवशीचा आहे.

    या फोटोमध्ये डावीकडील पायलटनं हातात करंजी धरलेली दिसत आहे तर आणखी एक करंजी थ्रस्ट लीव्हर पॅनेलच्या उजवीकडे ठेवलेली दिसत आहे. शिवाय तिथे दोन कॉफीचे कपही दिसत आहेत. हा फोटो समोर येताच या फ्लाईटच्या दोन्ही पायलट्सला आपली ड्युटी सोडावी लागली आहे. 'इंडिया टुडे'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    कॉकपिटमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर लगेचच स्पाइसजेटनं उड्डाण या दोन पायलट्सला ड्युटी करण्यापासून थांबवलं आहे. चौकशीनंतर दोघांवर कारवाई केली जाईल असं एअरलाइन्सनं सांगितलं आहे. "स्पाईसजेट कंपनीनं कॉकपिटमध्ये खाद्यपदार्थ खाण्याबाबत कठोर नियम तयार केलेले आहेत. सर्व फ्लाईट क्रूनं त्याचं पालन करणं अपेक्षित आहे. मात्र, या दोन पायलट्सनी हे नियम पाळले नाहीत. त्यामुळे चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर योग्य शिस्तभंगाची कारवाई केली जाईल," असं कंपनीनं एका निवेदनात म्हटलं आहे.

    आता कॉकपिटमधील खाद्यपदार्थांचा फोटो आणि पायलट्सवर कारवाई करण्याचा काय संबंध असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यामागे एव्हिएशन इंडस्ट्रीचा एक अलिखित नियम आहे. सामान्यपणे, उड्डाण करताना विमानातील कमर्शिअल पायलट्स एक सारखं अन्न खात नाहीत. दोघेही वेगवेगळे अन्नपदार्थ खातात. एका माजी पायलटच्या मते, स्पाइसजेटच्या पायलट्सनी हा नियम मोडला आहे. त्यामुळे त्यांना कदाचित कारवाईला सामोरं जावं लागेल.

    सध्या पॅसेंजर फ्लाईटचे पायलट असलेल्या आणखी एका पायलटनं सांगितलं की, फ्लाईटचा कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर वेगवेगळं जेवण खातात. तो म्हणाला, "विमान वाहतूक नियामक डीजीसीएनं का नियम बंधनकारक केलेला आहे की नाही याची मला कल्पना नाही. पण, सर्रासपणे पायलट्स या नियमाचं पालन करतात."

    विमानातील दोन्ही पायलट्स वेगवेगळं जेवण का खातात? या प्रश्नाचं उत्तर फार सोप आहे. समजा जेवणामुळे एखादा पायलट आजारी पडला तर त्याच्यापेक्षा वेगळं अन्न खाल्लेला पायलट ही परिस्थिती हाताळू शकतो. दोघांनीही सारखंच अन्न खाल्ल आणि दोघेही आजारी पडले तर मात्र, भीतीदायक परिस्थिती उद्भवू शकते. हे टाळण्यासाठी एकत्र फ्लाइट घेणारे दोन पायलट्स वेगवेगळं अन्न खातात. क्रूच्या जेवणाबद्दल बोलताना एका माजी कमर्शिअल पायलटनं सांगितलं की, "फ्लाईटमधील सर्व अन्न सुरक्षित असतं कारण विमान कंपन्या ते स्वतः तयार करतात."

    देशांतर्गत फ्लाईटदरम्यान पायलट्सला जेवण दिलं जातं का?

    विमान प्रवासादरम्यान पायलट्सला प्रत्येक वेळी जेवण पुरवलंच पाहिजे हे बंधनकारक नाही. क्रू सहसा फक्त इंटरनॅशनल फ्लाईट्स दरम्यान जेवतात. मात्र, अनेक क्रू मेंबर्स स्नॅक्स घेऊन कॉकपिटमध्ये पोहोचतात आणि फ्लाइटनं टेक ऑफ केल्यानंतर खातात. असं करणं नियमांचं उल्लंघन आहे. असेही काही नियम आहेत, जे केवळ अफवा म्हणून प्रसिद्ध केले जातात. एका क्रू मेंबरनं सांगितलं की, सर्वच एअरलाइन्स कंपन्या आपल्या फ्लाइट अटेंडंटना प्रवाशांसोबत डेटवर जाण्यास मनाई करत नाहीत. अनेक मोठ्या विमान कंपन्यांकडे असा कोणताही नियम नाही. या शिवाय, एअरलाइन्स आपले पायलट्स आणि फ्लाइट अटेंडंट्सच्या रिलेशनशीपलादेखील विरोध करत नाहीत. उलट, विमान वाहतूक क्षेत्रात असं होणं अत्यंत सामान्य मानलं जातं.

    केबिनमधील लाईट का बंद केले जातात?

    तुमच्यापैकी अनेकांनी बघितलं असेल की, फ्लाइटच्या टेक-ऑफ आणि लँडिंग दरम्यान कर्मचारी केबिनमधील लाईट बंद करण्याचा आग्रह करतात. ही एक महत्त्वाची सुरक्षा उपाययोजना आहे. लाईट बंद केल्यानं आपत्कालीन स्थितीत प्रवाशांना त्यांची दृष्टी अॅडजेस्ट करण्यास मदत होते आणि बाहेर पडण्याच्या सूचनादेखील अधिक चांगल्या दिसतात.

    दरम्यान, स्पाइसजेटच्या विमानाच्या कॉकपिटमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरील अनेकांनी संभाव्य धोके सांगितले आहे. जर, कॉफी कपमधील कॉफी फ्लाइटच्या कंट्रोल पॅनलवर सांडली असती तर ज्यामुळे शॉर्ट सर्किट किंवा मिड-फ्लाइट आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकली असती.

    First published:
    top videos

      Tags: Travel by flight