मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking Accident video : डोंगराचा कडा कोसळला, रेलिंग तुटली; कारही दरीत पडणार तोच झाला चमत्कार

Shocking Accident video : डोंगराचा कडा कोसळला, रेलिंग तुटली; कारही दरीत पडणार तोच झाला चमत्कार

एखादा फिल्मी सीन वाटावा अशी अपघाताची घटना प्रत्यक्षात घडली आहे.

एखादा फिल्मी सीन वाटावा अशी अपघाताची घटना प्रत्यक्षात घडली आहे.

एखादा फिल्मी सीन वाटावा अशी अपघाताची घटना प्रत्यक्षात घडली आहे.

    मुंबई, 06 जून : अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात (Accident video). असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. हा अपघात इतका भयंकर आहे पण त्यातही असं काही घडलं की पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. या अपघातात असं काही घडलं आहे जे कदाचित याआधी तुम्ही कधीच पाहिलं नसावा. एखादा फिल्मी सीन वाटावा अशी ही प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. ड्रायव्हिंगचे काही नियम असतात. पण काही लोक हिरोगिरी, स्टंटच्या नादात किंवा काही वेळा टेक्निल समस्यांमुळे गाड्यांचे अपघात होतात. अपघाताचा सर्वात जास्त धोका असतो तो डोंगरावरील वळणावळणाच्या रस्त्यावर. घाटात गाड्या दरीत कोसळल्याच्या काही घटनाही तुम्हाला माहिती असतील. अशाच दुर्घटनेचा हा व्हिडीओ आहे. हे वाचा - VIDEO: रस्त्यावर झालेल्या वादानंतर Scorpio चालकाने दुचाकीस्वाराला उडवलं; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद व्हिडीओत पाहू शकता एक कार घाटावरील रस्त्यावर भऱधाव वेगाने येताना दिसते. वळणावर ही कार रस्त्याच्या किनाऱ्यावरील रेलिंगला धडकते. कार हवेत उडतानाही दिसते. रेलिंग तुटतं. कारच्या धडकेने तिथले दगडही धाडधाड खाली दरीत कोसळताना दिसतात. त्याच वेळी आपल्याला धडकी भरते आणि अंगावरही अक्षरशः काटा येतो. आता कारही दरीत कोसळणार असं वाटत असतानाच अचानक धूरच धूर दिसतो आणि कार रस्त्याच्या किनाऱ्यावरच उभी दिसते. कार दरीत कोसळत नाही. रेलिंगला धडकून ती तिथंच अडकून राहते. अवघ्या काही सेकंदाच हा व्हिडीओ आहे. पण पाहताना हृदयाचे ठोकेही थांबल्यासारखे होतात. हे जे काही घडलं ते पाहून डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. पण तरी कार दरीत कोसळली नाही, हे पाहून जीवात जीव येतो. हे वाचा - छोट्याशा उंदराने मांजरीला जीव नकोसा करून सोडलं; रिअल लाइफ Tom and Jerry Video एकदा पाहाच म्हणतात ना काळ आला होता पण वेळ नाही, तेच या ड्रायव्हरच्या बाबतील घडलं. त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून तो या इतक्या मोठ्या अपघातातूनही बचावला आहे. हा व्हिडीओ म्हणजे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. मृत्यूच्या दारातून येणं म्हणजे काय, मृत्यूला स्पर्श करणं म्हणजे काय याचाच प्रत्यय या व्हिडीओतून येतो आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Accident, Viral, Viral videos

    पुढील बातम्या